• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या तारखेपर्यंत पावसाची पहावी लागणार वाट, त्यानंतर मध्य भारतात पावसाच्या सरी बरसणार

September 8, 2026 by admin Leave a Comment


राज्यात पावसाने अनेक जिल्ह्यात दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके पाण्याअभावी पिवळी पडत असल्या पाऊस केव्हा परतणार याची शेतकरी वाट पाहात असताना आता नागपूर सह संपूर्ण विदर्भात येत्या ११ तारखेपर्यंत पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता ११ तारखेनंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

नागपूर सह संपूर्ण विदर्भात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. बळीराजाची पिके पाण्याअभावी वाळली जात आहे. सोयाबिन आणि इतर पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात आता हवामान खात्याने वर्तवलेल्या भविष्यानुसार आता येत्या 11 तारखेपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 11 तारखे नंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. यात आता दिलासादायक बाब म्हणजे 12 ते 14 सप्टेंबरला विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तापमानात होणार वाढ

सध्या 11 तारखे पर्यंत पावसाचा अंदाज असला तरी तापमानात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमानात साधारणतः 3 ते 4 अंश सेल्सियस पर्यंत वाढ होऊन तापमान 32 अंश पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. विदर्भात साधारणतः 30 टक्के पर्यंत पावसाची तूट निर्माण झाली असून कमी पावसामुळे ही तूट सध्या तरी भरून निघण्याचा शक्यता दिसत नाही असे नागपूर हवामान विभागाचे संशोधक डॉ.प्रवीण कुमार यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

7 Sept, As per IMD model guidance next #good_spell in parts of Central India including parts of #Maharashtra could be around 13-15th Sept, where possibility of #interiors of state could be benefitted..
2nd half of Sept good activity possibly.
Keep track of imd updates pl. pic.twitter.com/w3zNoqbHWT

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 6, 2026

सप्टेंबर अखेर पाऊस परतणार

भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतातील काही क्षेत्रांमध्ये पावसाचा पुढील चांगला टप्पा (good spell) १३ ते १५ सप्टेंबरच्या सुमारास येण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे. यात राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धातही पावसाची चांगली सक्रियता दिसून येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

 

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in