• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ओमानच्या किनाऱ्याजवळ थेट जहाजावर हल्ला, परराष्ट्र मंत्रालयाचा संताप, तब्बल 11 भारतीय..

July 12, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.  इराणवर रात्रभर हल्ले अमेरिकेने केले. या हल्ल्याला इराणकडून उत्तर देण्यात आले. इराणने आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले केले. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर आक्रमक भूमिका घेत आखाती देशात हल्ले केले. इराणने होर्मुज खाडीत एका जहाजावर हल्ल केला त्यानंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. आता दोन्ही देशातील युद्धविराम चर्चा थांबल्या आहेत. यादरम्यानच भारताला ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. भारत सरकारने याचा जोरदार विरोध केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या किनारपट्टीजवळ जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याबाबतचे निवेदन जारी केले.

ज्या जहाजावर हल्ला झाला त्यात 11 भारतीय नागरिक होते. हल्ला झाल्यानंतर त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले तर 1 भारतीय नागरिक बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमान किनारपट्टीजवळ जीएफएस गॅलेक्सी जहाजाला निशाणा बनवण्यात आले. बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाचा शोध सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

संकटाच्या काळात मदत केल्याने ओमानच्या अधिकाऱ्यांचे धन्यवादही भारताकडून मानण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. यासोबतच चिंताही व्यक्त केली. व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले. भारताने कडक भूमिका घेत म्हटले की, व्यापारी जहाजांवर आणि नागरिकांवर हल्ले करणे चुकीचे आहे. या घटना ताबडतोब बंद व्हायला हव्यात.

व्यापारी सुरक्षित व्हायला पाहिजे, असेही भारताने यादरम्यान म्हटले आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट मोठी घोषणा करत होर्मुज खाडी बंद करत असल्याचे जाहीर करण्यात आले. होर्मुज खाडी बंद झाल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. भारतात एलपीजी गॅस होर्मुज खाडीतूनच दाखल होतो. आता कुठे होर्मुज खाडीतून जहाजांची ये जा सुरू होती. त्यातच आता थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. ज्याचा परिणाम थेट भारतावरही होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in