• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुख्यमंत्र्यांचा शेवटचा चित्रपट, अवघ्या तासाभरात हजारो तिकिटांची विक्री; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार?

July 12, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जन नायकन’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास सात महिन्यांनंतर सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. आता हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकामध्ये थलपती विजय यांच्या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ असून अवघ्या तासाभरात हजारो तिकिटं विकली गेली आहेत. सेन्सॉर बोर्डाने ‘जन नायकन’ला ‘A’ प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट एकूण 183 मिनिटं म्हणजेच 3 तास 3 मिनिटं आणि 11 सेकंदांचा आहे.

युकेमधील वितरक अहिंसा एंटरटेन्मेंटने या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिलं, ’24 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या जन नायकन या चित्रपटाची तिकिटं आता सिनेवर्ल्डमध्ये उपलब्ध आहेत आणि शोची संख्यासुद्धा प्रभावी आहे. अनेक वर्षांनंतर लोक तुम्हाला नक्कीच विचारतील की, तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला होतात का? त्यामुळे हा ऐतिहासिक चित्रपट नक्की पहा, कारण इतकी वर्षे आपलं मनोरंजन करणाऱ्या या स्टारचा हा शेवटचा चित्रपट आहे.’ ॲडव्हान्स बुकिंग सुरू होण्यापूर्वीच युकेमध्ये एका तासात ‘जन नायकन’ची हजारो तिकिटं विकली गेल्याची माहिती वितरकांनी पोस्टद्वारे दिली आहे.

वितरकांची पोस्ट-

🔥🔥 #JanaNayagan — 24 JULY! 🔥🔥

Tickets ON SALE at @cineworld and the show count is ABSOLUTELY INSANE!

Years from now, people will ask if you were there. Make sure your answer is YES.

This isn’t just a film. It’s a goodbye to the man who gave us everything. UK 🇬🇧 — we need… pic.twitter.com/8CvuAKIFA3

— Ahimsa Entertainment (@ahimsafilms) July 10, 2026

‘जन नायकन’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. जवळपास सात महिने हा चित्रपट प्रमाणपत्रासाठी ताटकळत राहिला. त्यानंतर त्यात 12 कट्स सुचवण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर निर्मात्यांनी आनंद व्यक्त करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

तासाभरात हजारो तिकिटांची विक्री

thousands of UK tickets sold in 60mins. the craze for this one name is just unbelievable. #JanaNayagan 🧨🧨🧨🧨🤯🤯🤯

— Ahimsa Entertainment (@ahimsafilms) July 10, 2026

थलपती विजय यांच्या चाहत्यांसाठी ही जणू आनंदाची पर्वणीच आहे. कारण राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘जन नायकन’ हा चित्रपट शेवटचा असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाले. यामध्ये ते अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहेत. तसंच बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम मेनन, प्रकाश राज, नारायण आणि प्रियामणी यांच्याही त्यात भूमिका आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in