
मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने १ सप्टेंबर २०२६ पासून सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या प्रति लिटर ९३ रुपये असलेला घाऊक दर वाढीनंतर १०२ रुपये होणार असून, हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहतील.
पशुखाद्याच्या किंमतीत सुमारे २५ टक्के वाढ, जनावरांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि एफडीएच्या कारवाईनंतर शुद्ध दुधाची वाढलेली मागणी ही दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
Leave a Reply