
मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो. त्यांनी उत्तमरित्या सहकार्य केलं आहे. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्र आणि दिल्लीमधला फरक आहे. महाराष्ट्राचे आमचे पोलीस कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत, हे जगाला कळलं. मी संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानतो, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली पोलिसांना टोला लगावला आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर याठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच घटनेवरून आता राज ठाकरेंनी शिवतीर्थवरील जल्लोष सभेत दिल्ली पोलिसांना हा टोला लगावला आहे.
Leave a Reply