• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भेगाळलेले पाय आणि घायाळ मन..धनंजय मुंडेंच्या जीम मधल्या व्हिडिओची चर्चा

September 7, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात पुन्हा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राज्याच्या राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत आरोग्याची विशेष काळजी घेत दर्शवले आहे. मुंडे यांनी व्हिडिओसोबत एक कविता देखील शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे’ अशा आशयाची ओळी पोस्टमधील कवितेत आहे. त्यांचा या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिम लावल्याचे भाष्य केले होते. मुंडे यांनी एका जाहीर सभेत जीम लावल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी कमबॅक करणार संकेत दिले होते. मुंडे यांनी आरोग्याची काळजी घेत सांगितले होते. परंतु मुंडे यांच्या त्या जाहीर सभेतील आक्रमक भाषणामुळे राजकारणात पुन्हा कमबॅक करणार असल्याची जोरदार सुरू झाली होती. परंतु त्यांनी आरोग्यावर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळीच जीम लावल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांचा जीममधील व्हिडिओ समोर आला आहे.

धनंजय मुंडे यांनी एक कविता व्हिडिओसोबत शेअर केली आहे. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे. भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे. निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे. हरवण्याची आता बिशाद कुणाची…स्वतःशी सुद्धा लढतो आहे, अशा आशयाची कविता मुंडे यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे व्यायाम करताना दिसत आहेत.

दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक कारण देत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. मागील काही दिवसांपासून विविध व्याधींना सामोरे जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. खरंतर एका प्रकरणामुळे बीडच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या धनंजय मुंडे यांना बॅकफुटवर यायला लागलं. त्यांच्या हातातून पालकमंत्री देखील गेलं. त्यामुळे तेव्हापासून धनंजय मुंडे बीडसह राज्याच्या राजकारणात धडकण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु कोणीही याबाबत अधिकृत दुजोरा दिला नाही. त्यानंतर आता त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
  • Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
  • Jui Gadkari: रात्री झोपले अन् सकाळी थेट ICUमध्ये; कोमात होती जुई गडकरी, सांगितला धक्कादायक अनुभव
  • मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली… उपचारही सोडले, दानवे थेट अंतरवलीत; काय घडतंय?
  • अफजल खानाचा कोथळा काढल्यावर डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in