
आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका सदस्याला MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिक पडताळणी पूर्ण करून पात्र ठरलेल्या मृत व्यक्तींच्या वारसांची यादी जारी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित वारसांच्या कागदपत्रांची छाननी केली असून, त्यांना नियुक्ती देण्याबाबत पुढील आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply