• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल

September 7, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुई हे एकप्रकारे चीनी वास्तुशास्त्र आहे. ज्या प्रमाणे वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकरात्मक ऊर्जा या दोन मुख्य घटकांवर काम करते, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकरात्मक ऊर्जा या दोन घटकांवरच काम करते. फेंग शुई शास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक काही समस्या निर्माण होतात. जसं की तुम्ही दिवस-रात्र कष्ट करून पैसा कमावला तरी तो पैसा फार काळ तुमच्या हातात टिकत नाही. कोणत्या न कोणत्या कारणांमुळे तो खर्च होतो. तसेच काही कारण नसताना घरात वाद निर्माण होतात.

फेंग शुई शास्त्रानुसार अशा काही विशिष्ट वस्तू असतात, त्या जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, दरम्यान या उलट अशाही काही वस्तू असतात, ज्या घरात ठेवणं शुभ माण्यात आलं आहे. या वस्तूंमुळे घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला आळा बसतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.  घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा शुभ प्रभाव हा घरावर आणि घरातील व्यक्तींवर होतो. चला तर मग जाणून घेऊयात अशा नेमक्या कोणत्या वस्तू आहेत.

लाफिंग बुद्धा – फेंग शुई शास्त्रानुसार  घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवणं हे शुभ मानलं गेलं आहे. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात असेल तर घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जर घरात सतत वाद निर्माण होत असतील तर अशा घरामध्ये लाफिंमग बुद्धाची मूर्ती असावीच असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

तीन पायाचा बेडूक – फेंग शुई शास्त्रामध्ये तीन पायाच्या बेडकाच्या मूर्तीला देखील शुभ माण्यात आलं आहे. जर तुमच्या घरात धनाशी संबंधित काही समस्या असतील तर अशा लोकांनी आपल्या घरात तीन पायाच्या बेडकाची मूर्ती ठेवावी असं फेंग शुई शास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल
  • Vastu Tips : बेडखाली या वस्तू नकोच..कमी होऊ शकते घरातली सुख शांती; काय सांगतं वास्तूशास्त्र ?
  • अर्धा भारत नेस्तनाबूत… पाकिस्तानचा महाभयंकर व्हिडीओ, बघताच क्षणी… नेटकऱ्यांनी केली धुलाई
  • इराणसोबत युद्ध सुरू असतानाच मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेत मोठी खळबळ
  • मुलीचा जन्म झाला की हे गाणं प्रत्येक घरात वाजतं, 50 वर्षांपासून सुपरहिट, लता मंगेशकरांच्या आवाजमुळे आजही…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in