• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्धा भारत नेस्तनाबूत… पाकिस्तानचा महाभयंकर व्हिडीओ, बघताच क्षणी… नेटकऱ्यांनी केली धुलाई

September 7, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान जेव्हा जेव्हा युद्ध हारतो तेव्हा तेव्हा तो एक ठेवणीतलं अस्त्र काढतो. ते म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. प्रोपगंडा. ऑपरेशन सिंदूरमध्ये तोंडावर आपल्यानंतर पाकिस्तानच्या एअर फोर्सने हेच जुनं हत्यार उपसलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरवर काढलेल्या डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून पाकिस्ताननेही प्रोपगंडा व्हिडीओ जारी केला आहे. PAF ने 6 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे काल ‘फिजाओं के पासबां’ नावाचा हा व्हिडीओ काढला आहे. फलक में इनकी धाक है… हे गाणं या व्हिडीओत वाजवण्यात आलं आहे. या व्हिडीओत अर्धा भारत नेस्तनाबूत झाल्याचा हस्यास्पद दावा करण्यात आल्याने सोशल मीडियातून या प्रपोगंडा व्हिडीओची चांगलीच धुलाई केली जात आहे.

गंमतीचा भाग म्हणजे या व्हिडीओत पाकिस्तानने हस्यास्पद दावे केले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर हसू आवरता आवरत नाही आणि राग थांबता थांबत नाही. एआय आणि ग्राफिक्सचा पुरेपूर वापर करून हा बनावट व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओत एकापेक्षा एक हस्यास्पद दावे केले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या 32 केला, दोन S-400 सिस्टम उडवल्या, भारताची मिलिट्री सॅटेलाईट जाम करण्यात आले, असे एकापेक्षा अनेक दावे या व्हिडीओत करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या या व्हिडीओतील दाव्यानुसार, पाकने भारताचे आठ विमान पाडले आणि भारताचा फ्यूल सप्लाय जाम केला.

 

WTF is this?

Pakistan Air Force (PAF) has released a new propaganda animated video, claiming it achieved all of this during the conflict:

• 32 IAF bases hit
• 2 S-400 systems hit
• Indian National Grid destabilized
• Indian grid outage
• Fuel supply chain fractured
•… https://t.co/jhlyo2pyL0 pic.twitter.com/qkj4yQ1F8T

— Shadow IND (@ShadowIND_IN) September 7, 2026

नकाशावर स्फोटाचे निशाण

विशेष मह्णजे पाकिस्तान हवाई दलाचे डायरेक्टोरेट जनरल पब्लिक रिलेशन्स (DGPR) ने X वर हा व्हिडीओ अधिकृतपणे शेअर केला आहे. या व्हिडीओत भारताच्या नकाशात प्रत्येक ठिकाणी स्फोटाचे निशाण दाखवण्यात आले आहेत. त्यावर मोठ्या आणि ठळक अक्षरात – 32 IAF BASES HIT असं लिहिलं आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानचा हा संपूर्ण व्हिडिओ अॅनिमेशन आणि ग्राफिक्सवर आधारीत आहे. त्यात कोणतीही सॅटेलाईट इमेज नाहीये. तसेच खरोखर नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाहीये. रनवेवर कोणतेही खड्डे नाहीत, कोणतंही हँगर क्षतिग्रस्त झाल्याचं दिसत नाहीये. पाकिस्तानने निव्वळ संगणकावर बसून ही करामत केली आहे.

पुरावे आणि व्हिडीओ फुटेज

भारताने जी डॉक्युमेंट्री केली होती. ती डिस्कव्हरी चॅनलने 15 ऑगस्ट रोजी दोन पार्टमध्ये प्रसारित केली होती. ‘डीक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर’ असं या डॉक्युमेंट्रीचं नाव होतं. या डॉक्युमेंट्रीत भारताच्या तत्कालीन तीन सैन्यांचे प्रमुख दावे आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांची प्रतिक्रिया आहे. सबूत आहेत आणि व्हिडीओ फुटेज आहेत. पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी माफी मागत असल्याचं डीजीएमओने स्पष्ट केल्याचंही भारताच्या डॉक्युमेंट्रीत दाखवण्यात आलं आहे.

पब्लिक डोमेनमधील उलब्ध माहितीनुसार, भारतीय हवाई दलाकडे 60 हून अधिक एअर स्टेशन आहेत. यात फ्रंटलाईन फायटर बेस, ट्रेनिंग सेंटर आणि मेंटेनन्स यूनिटचा समावेश आहे. 32 बेसवर हल्ला करण्यात आल्याचा दावा म्हणजे भारतीय हवाई दलाची अर्ध्याहून अधिक क्षमता नष्ट झाली. पण पाकिस्तानकडून भारताचं नुकसान केल्याचा सिंगल पुरावाही देऊ शकलेला नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या व्हिडीओतील दावे हे हस्यास्पद मानले जात आहेत.

मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्ताननेही याच प्रकारचे दावे केले होते. त्यावेळीही पाकिस्तानने कोणतेच सॅटेलाईट पुरावे दिले नव्हते. स्वतंत्र सॅटेलाईट इमेजरी विशेषज्ञांनी भारतीय एअरबेसवरील कोणत्याही नुकसानीचा एकही फोटो जारी केलेला नव्हता. 10 मे रोजी युद्ध थांबल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 मे रोजी स्वत: आदमपूर एअरबेसवर गेले होते आणि पाकिस्तानने S-400ला नुकसान पोहोचवल्याच्या दाव्याची चंपीच केली होती.

भारताकडून पुरावे

या उलट भारताने पाकिस्तानी एअरबेसवर झालेल्या नुकसानीचे पुरावे दिले होते. नूर खान, मुरीद, रफिकी, सरगोधा, जैकाबाबाद आणि भोलारी आदी ठिकाणचे सॅटेलाईट फोटो आणि व्हिडीओ फुटेज भारताने जारी केले होते. पाश्चात्य मीडियानेही या पुराव्यांना दुजोरा दिला होता. भारताने रडार, एअर डिफेन्स सिस्टिम आणि एअरक्राफ्ट हँगरवर निशाणा साधला होता. तर, पाकिस्तानची मुख्य कारवाई केवळ ड्रोन आणि मिसाईलपर्यंतच मर्यादित होती. त्यालाही भारताने तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर पाकिस्तानच्या या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. हा व्हिडीओ म्हणजे लाहोरी चुरन असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तुमचा एवढा मोठा विजय झाला तर सॅटेलाईट फोटो कुठे आहेत? असा सवाल केला जात आहे. केवळ ग्राफिक्सवरच निर्भर राहणार का? असे टोलेही नेटकरी पाकिस्तानला लगावत आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
  • तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
  • आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरे, शहरात राहणाऱ्यांसाठी खास योजना
  • शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्व
  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in