• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!

September 7, 2026 by admin Leave a Comment


लग्नाला वर्षही पूर्ण झाले नसताना एका महिलेचा संसारच रक्तरंजित झाला. पतीने या महिलेची हत्या केली. तिच्या मृतदेहासोबत त्याने नंतर भयंकर कृत्य केले. हत्या करून धडापासून शीर वेगळे केले. पॉलिथीनच्या बॅगमध्ये शीर ठेवून नंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. लग्नाला एक वर्षही झालेलं नसताना पतीने अशा प्रकारे पत्नीची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून पतीने गुन्हा कबुल केला आहे. अवैध लैंगिक संबंधाच्या संशयातून हे हत्याकांड घडले आहे.

पोलिसांना घराचा दरवाजा उघडाच दिसला, नंतर…

समोर आलेल्या माहितीनुसार मृत महिलेची ओळख रिया तालुकदार अशी झाली असून ती एका बुटीकमध्ये काम करत होती. तिचा पती रामानुज गोस्वामी हा कॅब चालक असल्याची होता. काही दिवसांपासून रिया तालुकदार आणि रामानुज गोस्वामी यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. तक्रार आल्यानंतर हाटीगाव पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. आत जाऊन पाहिल्यावर पोलिसांना रियाचा मृतदेह आढळून आला. सोबतच पोलिसांना तिचे शीर फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आढळले, तर शरीराचा उर्वरित भाग घरात पडलेला दिसला. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली.

दरम्यान, आसाममधील गुवाहाटीतील बेलटोला परिसरात ही घटना घढली आहे. बायकोचा खून करून रामानुज स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने गुन्हा कबुल केला आहे. चौकशीदरम्यान त्याने पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगितले.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पोलिसांच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोघांमधील कडाक्याचे भांडण दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत सुरू होते. पुढे हे भांडण जास्तच वाढले. रागात आलेल्या रामानुजने रियाची थेट हत्या केली. त्याने रियाचे शीर धडापासून वेगळे करून फ्रिजमध्ये ठेवले. तर रियाचे धड घरातच पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्रही जप्त केले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल
  • लॉलीपॉप ते चोर… शिवसेना भाजपात बँनरवॉर रंगलं, महायुतीमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • Chanakya Niti : आचार्य चाणक्यांची ही शिकवण मुलींना देणार यश, तिसरा नियम अगदी सोपा!
  • 20 रुपयांच्या वडापावसाठी तरुणीने खर्च केले 15 हजार, चक्क फ्लाइट पकडून पोहोचली मुंबईत
  • माझे कर्मचारीच मला सहज लक्ष्य करतायेत, एका वर्षात चारदा बदली झालेल्या IAS नेहा मारव्या सिंह यांचं पत्र

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in