
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे. यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये नोव्हेंबर 2026 मध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी जे काही सर्व्हे समोर येत आहेत, त्यातून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय, तसेच आर्थिक धोरणांबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अमेरिकेचं इराणसोबत सुरू असलेलं युद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण त्यामुळे देशात वाढलेली महागाई, जगण्याचा वाढलेला खर्च यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं काही सर्व्हेंमधून समोर आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणजे ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड घसरली असून, आता ती केवळ 33 टक्के एवढीच राहिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढचं आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे जर सर्व्हेचा कल मध्यवर्ती निवडणुकांपर्यंत असाच कायम राहिला तर त्याचा मोठा फटका हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने केलेल्या एका सर्व्हेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता आता केवळ 33 टक्के इतकीच राहिली असल्याचं समोर आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या लोकप्रियतेमध्ये झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट आहे. सर्व्हेनुसार तब्बल 64 टक्के अमेरिकन नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिकेमध्ये महागाईचा भडका
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत इतर देशांमधून होणाऱ्या विविध वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुसरीकडे अमेरिकेचं इराणसोबत युद्ध सुरूच आहे. या युद्धावर सध्या अमेरिकेकडून प्रचंड खर्च होत आहे, हीच दोन प्रमुख कारणं आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला ओव्हटी लागली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढचं हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
Leave a Reply