• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अफजल खानाचा कोथळा काढल्यावर डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता, संजय राऊत यांचा हल्लाबोल

September 7, 2026 by admin Leave a Comment


शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली, त्यावेळी डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता. अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून उत्सव साजरा केला नव्हता. लोकमान्य टिळक तुरुंगातून आले तेव्हा डीजे वाजवला नव्हता, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डीजेंचं समर्थन करणाऱ्यांवर हल्ला चढवला. तसेच उत्तरेतील संस्कृती इथे आणण्याचं काम नाही हे राज ठाकरे असं ठाकरे म्हणाले होते. त्याचंही राऊत यांनी समर्थन केलं.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी डीजेचं समर्थन करणाऱ्या राज्यातील मंत्र्यांवरही हल्ला चढवला. डीजेवर बंदी घालण्याचं समर्थन राज्यातून होत आहे. मिंध्यांचे दोन तीन मंत्री सोडले तर कुणीही डीजेचं समर्थन करत नाही. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी डीजे वाजवण्यास पाठिंबा दिला. त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या आवारात डीजे वाजवत बसवावं. काही दिवसाने त्यांना हे काम करावं लागणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तर पाठिंबा दिला पाहिजे

हा सांस्कृतिक उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केला. काल पुणेकर रस्त्यावर उतरले. डीजेमुळे काय काय घडतंय? काय काय अपाय होतोय? शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काय अपाय होतोय हे सर्वांनी सांगितलं. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी डीजेमुळे त्यांच्या भावाचं निधन झालं झाल्याचं सांगितलं. एक मंत्री सांगते. या गोंधळाने त्यांच्या एका भावाचं निधन झालं. मोर्चातील एक महिला वर्षा कदम यांच्या वडिलांनी हातावर प्राण सोडला पण रुग्णवाहिका पोहोचली नाही. महाराष्ट्रातील या सर्व घटना आहे. एका सामाजिक भावनेतून लोकं एकत्र आले असतील तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

फडणवीस कुंपणावर

राज ठाकरेंनी डीजे बंदीला पाठिंबा दिला. फडणवीस नेहमीप्रमाणे कुंपणावर आहेत. मग ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कशाला आहेत? जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एखाद्या सामाजिक प्रश्नावर कुंपणावर बसून मजा बघत असतील तर तुम्ही कायद्याचं राज्य चालवता कसं म्हणता येईल. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी डीजे बंदीचा आदेश काढला. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी भूमिका घेतली. मग पुण्यताचं काय? पुण्यात असं काय आहे? मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे का? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री अपयशी

बापट काल मोर्चात आले नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे, असं पोलिसांनी सांगितलं. एका नागरिकाच्या जीवाला धोका हे पोलीस जाऊन सांगतात. मोर्च्यात जाऊ नका म्हणून सांगतात हा गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा पराभव आहे. त्यांना खुलासा करावा लागेल. ज्या पुण्यात नरेंद्र दाभोळकरांची हत्या होते, त्या पुण्यात बापटांच्या जीवाला धोका आहे. भाजपने गुंडांच्या टोळ्या पाळल्या का?राज्याचे गृहमंत्री अपयशी आहेत. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवेत. मुख्यमंत्री कुंपणावर आहेत. गृहराज्यमंत्री डीजेचं समर्थन करत आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.

त्यांना आवरा

ठाण्यात गौतमी पाटीलला कोण नाचवत होते? हिडीस नृत्य कोण करत होतं, ही संस्कृती आहे का? याकडे लक्ष दिलं पाहिजे. फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे. भाजपचे सुपारी किलर जे संस्कृती रक्षकाच्या नावाने फिरत आहेत. त्यांना फडणवीस यांनी आवरलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in