• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील सर्वात उंच धबधबा, पावसाळ्यात पाहण्यासाठी होते प्रचंड गर्दी, सौंदर्य पाहून म्हणाल प्लॅन ठरला

July 21, 2026 by admin Leave a Comment


पावसाळा सुरू होताच मेघालयातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये पुन्हा धबधबे सुरु झाले आहेत. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. यामध्ये नोहकालिकाई धबधबा हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

भारतातील सर्वात उंच प्लंज वॉटरफॉल म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा सुमारे 340 मीटर (1,115 फूट) उंचीवरून कोणत्याही खडकावर न अडता थेट खाली कोसळतो.

या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पाण्याचा मुख्य स्रोत मेघालयातील मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचे रौद्र आणि तितकेच मोहक रूप पाहायला मिळते. उंचावरून कोसळणारी शुभ्र जलधारा, सभोवतालची दाट हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि खाली तयार होणारे निळसर-हिरवे नैसर्गिक तळे हे दृश्य पर्यटक आणि फोटोग्राफरसाठी खास पर्वणी ठरते.

नोहकालिकाई धबधब्याशी एक हृदयद्रावक लोककथाही जोडलेली आहे. स्थानिक कथेनुसार, 'का लिकाई' नावाच्या महिलेच्या आयुष्यात घडलेल्या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ या धबधब्याला 'नोहकालिकाई' म्हणजेच 'लिकाईची उडी' असे नाव देण्यात आले.

पावसाळ्यात येथे थंडगार वारे, दऱ्यांवर तरंगणारे ढग आणि सतत कोसळणाऱ्या धबधब्याचा नयनरम्य देखावा अनुभवायला मिळतो. येथील व्ह्यू पॉइंटवरून धबधब्याचे अप्रतिम दर्शन घेता येते. सकाळच्या वेळेत गर्दी कमी असल्याने आणि प्रकाश अनुकूल असल्याने येथे फोटो देखील खूप खास येतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in