• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फडणवीस, शिंदेंवर वारंवार बोलणं… उदय सामंत यांचा जरांगेंना मोठा सल्ला; नेमकं काय म्हणाले?

September 8, 2026 by admin Leave a Comment


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. आजही सोडवत आहेत. मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय या दोघांनी घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार बोलणं आणि मंत्र्यांवर वारंवार बोलणं हे काही योग्य नाही. जरांगेंनी जरा संयमाने घ्यावं, असा सल्लाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. मराठा समाजाला न्याय दिला नाही, त्यांचं कौतुक केलं जातं. जरांगेंना विनंती आहे. आमचे दोघांचे संबंध राजकारण आणि आंदोलनाच्या पलिकडचे आहेत. तुमच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या आहेत. तीन मागण्यात कायदेशीर बाबी आहेत. तुम्ही वेळ दिला तर त्यातून मार्ग निघेल. जरांगेंनी समजून घ्यावं, असं उदय सामंत म्हणाले.

पहाटे 3 वाजता चर्चा

मागण्या मान्य केल्या त्या रास्त आहेत. ज्या प्रलंबित आहे, त्याला कालावधी द्या. मी आणि प्रसाद लाड यांनी पहाटे 3 वाजता जरांगेंशी फोनवर चर्चा केली. अर्धा तास आम्ही बोललो. त्यांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. त्यामुळे जरांगे आता सलाईन घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरात आयुक्तालयात बैठक आयोजित केली आहे. मी आणि लाड निघालो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

भेटीसाठी नव्हे, आढावा घेण्यासाठी…

जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून दर तासाला, दर मिनिटाला आम्ही विनंती करत आहोत. त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होतेय याची माहिती घेण्यासाठी आयुक्तालयात जात आहोत, असं सांगतानाच जरांगेंना भेटण्यासाठी जात आहे, असं मी म्हणालो नाही. आम्ही आयुक्तालयात मागण्यांचा आढावा घेण्यासाठी जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यावर विश्वास ठेवू नका

एकनाथ शिंदे हे विरोधी गटाला बळ देत आहेत हा गैरसमज आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय. फडणवीस आणि शिंदे अशा काही गोष्टी करतील असं काही नाही. त्यावर जरांगेंनी विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अडचण होणार नाही याची दक्षता घ्या

मनोज जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर ते मुंबईत येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गणेशोत्सव सुरू होत आहे. हिंदूंचा हा सर्वात मोठा सण आहे. मुंबईतील गणेशोत्सवाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. तिथे अडचण येता कामा नये. जरांगेंनी मुंबईत येऊन अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in