• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात सापडली डेड बॉडी, मेडिटेशनहून येताच… एलिगेंट टेरेसमधील त्या घटनेने सिनेसृष्टी हादरली

June 25, 2026 by admin Leave a Comment


एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या व्यक्तीने अभिनेत्रीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख वैशाख उपाध्याय (वय ४५) अशी झाली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

कोण आहे ती अभिनेत्री?

बंगळुरुच्या आरआर नगरमध्ये लोकप्रिय कन्नड अभिनेत्री कृषि थापंडाच्या घरी हा मृतदेह सापडला आहे. मृतदेह घराच्या आत फास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची वैशाख उपाध्यायने बुधवारी रात्री उशिरा बंगरप्पा गुड्डा येथील ‘एलिगंट टेरेस’ अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये स्वत:चे जीवन संपवले आहे. मृत व्यक्तीचे वैवाहिक जीवनात मतभेद चालू होते. यामुळे तो अभिनेत्री कृषी थापंडा यांच्या घरी येऊन थांबत असे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच आरआर नगर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

वैशाख कुटुंबात पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा

वैशाख यांच्या कुटुंबात पत्नी आणि १४ वर्षांचा एक मुलगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाख आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून वारंवार भांडणे होत होती. यामुळे तो अनेकदा अभिनेत्री कृषी थापंडा यांच्या घरी राहत असे.

व्यावसायिकाला धमकी देण्याच्या आरोपात झाली होती अटक

एक व्यावसायिक एवीआर रेड्डी यांनी केस दाखल केल्यामुळे वैशाख आणि त्यांच्या पत्नीमधील वाद अधिक वाढला होता. यापूर्वी वैशाख यांना व्यावसायिक एवीआर रेड्डीला कथित धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती. हे प्रकरण HAL पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते मोठ्या तणावात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अभिनेत्री कृषि थापंडा या अपार्टमेंटमध्ये उपस्थित नव्हत्या. त्या महादेवपुरा येथील ‘क्षेमवन’ मध्ये ध्यान (मेडिटेशन) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाऊस आणि दुचाकीचा प्रवास! रस्ते निसरडे होण्यापूर्वी जाणून घ्या सुरक्षित बाईक रायडिंगचे सोपे नियम
  • मृत्यूनंतर नाक आणि कानात कापूस का ठेवला जातो? धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारणांचा उलगडा
  • Gold Rate : स्वस्तात दागिने करण्याची हीच वेळ, सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त, 10 ग्रॅमचा भाव प्रचंड घसरला!
  • उगाचंच माझ्या XXX… हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
  • रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा, म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in