• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पूर्व पतीच्या 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी करिश्मा कपूरचा लढा, निकाल जाहीर, नफ्यात तब्बल इतकी वाढ

July 24, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर सोना कॉमस्टार चर्चेत आहे. एकीकडे संजय याची दुसरी पत्नी करिश्मा कपूर आणि तिसरी पत्नी प्रिया कपूर सचदेव यांची 44,840 कोटींच्या संपत्तीसाठी कोर्टात लढा सुरु आहे. तर दुसरीकडे कंपनीने निकाल जाहीर केले आहेत, ज्याकडे सर्व गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या तीन महिन्यात कंपनीने मोठी कमाई केली आहे. शिवाय कंपनीच्या नफ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर, कंपनीने भविष्यासाठी देखील एक मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.

आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-जून तिमाहीत ‘सोना कॉमस्टार’चा महसूल 54 टक्क्यांनी वाढून 1 हजार 310 कोटी रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा 45 टक्क्यांनी वाढून 181 कोटी रुपये झाला. त्याचप्रमाणे, EBITDA देखील जवळपास 49 टक्क्यांनी वाढून 303 कोटी रुपयांवर गेला. कंपनीने नमूद केलं की, ही त्यांच्या इतिहासातील सर्वात दमदार तिमाहीपैकी एक होती.

इलेक्ट्रिक गाड्यांमधून झालीये सर्वात जास्त कमाई

कंपनीची सर्वांत जास्त कमाई इलेक्ट्रिक गाड्यांमधून झाली आहे. या सेगमेंटमध्ये होणाऱ्या कमाईत एका वर्षात 107 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता कंपनीची एकून कमाईत इलेक्ट्रिक गाड्यांच्या व्यवसायाची भागीदारी 44 टक्क्यांनी वाढली आहे. आता कंपनीने यावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

रोबोटिक्समध्ये उतरणार कंपनी

आर्थिक निकालांसोबतच कंपनीने Sona Comstar 2.0 ही नवीन रणनीती देखील जाहीर केली. याअंतर्गत, कंपनी आता केवळ ऑटो पार्ट्सपुरती मर्यादित राहणार नाही; तर भविष्यात ती रोबोटिक्स आणि फिजिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांमध्येही कार्यरत असेल. पुढील 10 वर्षांत आपला व्यवसाय दहापटीने वाढवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

काय करते सोना कॉमस्टार?

सोना कॉमस्टार कार आणि इतर वाहनांसाठी आवश्यक असे हाईटेक पार्ट्स सुटे भाग तयार करते. तिचे हे भाग इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि पेट्रोल-डिझेल अशा सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये वापरले जातात. ही कंपनी अनेक प्रमुख जागतिक वाहन उत्पादक कंपन्यांना पुरवठा करते. तसेच, कंपनीने नुकताच जपानच्या ‘डेन्सो’ (DENSO) सोबत भागीदारी केली आहे; या पावलामुळे त्यांचा इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन व्यवसाय अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

करिश्मा कपूर – संजय कपूर यांचं नातं

करिश्मा कपूर – संजय कपूर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. करिश्मा ही संजयची दुसरी पत्नी होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. घटस्फोटानंतर करिना हिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. तर, संजय याने तिसरा संसार थाटला. आता दोघींमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in