• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

न्यूझीलंड आणि भारत सांस्कृतिक संबंधात, BAPS समुदायाची महत्वाची भूमिका

July 13, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूझीलंडमधील ऑकलँडमधील अधिकृत दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्याच्या समारोप झाला. यासोबत भारत आणि न्यूझीलंड संबंधांच्या विकास कथेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंध औपचारिकरित्या “सामरिक भागीदारी” ( Strategic Partnership ) स्तरावर नेणे आणि २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट काढून ३५,००० कोटीपर्यंत ( ७ अब्ज न्यूझीलंड डॉलर ) नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट यांसारखे राजकीय यश या दौऱ्यात मिळाले आहे.

हा भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्दी यशाचा पाया सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, श्रद्धा आणि लोक-ते-लोक संबंधांच्या खोलवर रुजलेल्या इतिहासात आहे. दोन्ही देशांमधील संबंध आणि परस्पर सद्भावना वाढवण्यासाठी सातत्याने व्यासपीठ ठरलेले BAPS स्वामीनारायण समुदायाची संस्था न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही ठिकाणी या सांस्कृतिक सेतूच्या केंद्रस्थानी आहे.

“किआ ओरा मोदी” या नावाने ऑकलंड येथे आयोजित केलेल्या भव्य मेळाव्याला १०,००० हून अधिक समुदाय सदस्य एकत्र आले होते. न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन हे भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आले. या दोन्ही देशांनी वर्षानुवर्षे जोपासलेल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सद्भावनेचा कळस भविष्यासाठीच्या एका सामायिक दृष्टिकोनात बनला,यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि स्थानिक माओरी संस्कृती यांचा सुरेख मिलाफ घडवला आहे.

हा मेळावा भारत-न्यूझीलंड मैत्रीचा उत्सव

हा मेळावा भारतीय समुदायाचा असला तरी तो प्रत्यक्षात भारत-न्यूझीलंड मैत्रीचा उत्सव होता असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते यावेळी म्हणाले की समुदायाच्या स्वयंसेवी आणि दानधर्माच्या उल्लेखनीय परंपरेचे कौतुक केले.’वाका’ म्हणजे केवळ होडी नाही, तर तो सामायिक प्रवासाचे प्रतीक आहे; भारत–न्यूझीलंड ‘वाका’ आता एका नव्या प्रवासासाठी सज्ज आहे, असेही पंतप्रधान नरेंद मोदी यावेळी म्हणाले.

येथे पोस्ट वाचा –

🇮🇳🤝🇳🇿
Bridging Cultures.
Strengthening Friendships.

From PM Christopher Luxon’s visit to Swaminarayan Akshardham in 2025 to BAPS Celebrations in New Zealand to now, PM Narendra Modi’s warm welcome in Auckland, these moments reflect the growing India–New Zealand Strategic… pic.twitter.com/neO5hXhztG

— Swaminarayan Akshardham – New Delhi (@DelhiAkshardham) July 13, 2026

‘सेवे’वर आधारलेला पाया

न्यूझीलंडचे नेतृत्व आणि भारतीय समुदाय यांच्यातील घनिष्ठ नाते सप्टेंबर – २०२३ मध्ये प्रकर्षाने पुढे आले आहे. ऑकलंडमधील BAPS स्वामीनारायण मंदिरातील जन्माष्टमी सोहळ्याला विरोधी पक्षनेते या नात्याने उपस्थित राहिलेल्या ख्रिस्तोफर लक्सन यांनी या समुदायाच्या मूलभूत तत्त्वांचे कौतुक केले. ख्रिस्तोफर लक्सन यावेळी म्हणाले की, समुदायाच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आणि त्यांनी न्यूझीलंडवासीयांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आहे.

येथे पोस्ट पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Swaminarayan Akshardham – New Delhi (@delhi.akshardham)

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरही त्यांच्या सरकारने BAPS समुदायाला प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले. ऑक्टोबर २०२५ मध्ये वेलिंग्टनमधील BAPS स्वामीनारायण मंदिरात दिवाळी आणि हिंदू नववर्ष सोहळ्यात लक्सन म्हणाले की, या समुदायाच्या भक्कम आणि चैतन्यमय योगदानाशिवाय आजचे न्यूझीलंड घडले नसते, आणि पुढच्या पिढीतील तरुणांपर्यंत ही मूलभूत मूल्ये पोहोचवल्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

येथे पोस्ट वाचा –

नवी दिल्लीपासून ऑकलंडपर्यंत: अक्षरधाम कनेक्शन

स्थानिक समुदाय पाठिंब्यापासून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीपर्यंतचा हा प्रवास मार्च – २०२५ मध्ये पुढे सरकला,जेव्हा पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारताचा अधिकृत राजकीय दौरा केला. ११० सदस्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह लक्सन यांनी नवी दिल्लीतील पवित्र स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतले. अक्षरधामची ही भेट अत्यंत प्रतीकात्मक ठरली, ज्यामुळे ख्रिस्तोफर लक्सन यांनी न्यूझीलंडच्या बहुसांस्कृतिक वीणेबद्दल आपला अभिमान व्यक्त केला.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याच्या सूचना..
  • Nitin Gadkari: मंत्र्यांच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी खंत, जातीय सेलवरही निशाणा
  • Nepal Flood: तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी मदत
  • आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच…
  • MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in