• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिल्लीत रंगले चहा पॉलिटिक्स! विरोधकांचा बहिष्कार, कनिमोळींची हजेरी, DMK चा नेमका संदेश काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment


संसदेचे पावसाळी अधिवेशन आज, गुरुवारी समाप्त झाले. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगिती करण्यात आले. तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील कोंडी फुटण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चहापानाचे आयोजन केले होते. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार घातला. गेल्या काही दिवसांपासून डीएमके काँग्रेससोबत फटकून वागत आहे. त्यामागे तामिळनाडूमधील सध्याचे राजकीय गणितं आहेत. त्याचाच फायदा घेत द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी मात्र चाय पे चर्चेला हजेरी लावली. या चहा पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) अनेक खासदार उपस्थित होते. कनिमोझी यांची उपस्थिती ही बदलत्या समीकरणांची नांदी तर नाही ना? असा सवाल केला जात आहे.

विरोधकांकडे कारणांची जंत्री

विरोधकांनी चहा पार्टीवर बहिष्कार का टाकला याची कारणांची यादीच वाचून दाखवली. लोकसभा अध्यक्षांनी पारंपारिक भाषण केले नाही. सभागृहातील कामकाजावरून काँग्रेसने या चहापानावर बहिष्कार घातल्याचे समजते. पण त्याअगोदर चहापानासाठी खासदार प्रियंका गांधी जाणार होत्या अशी माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा हजेरी लावणार असल्याचा दाव करण्यात येत आहे. पण वेळेवर काँग्रेसचा कोणताही नेता या चहा पार्टीकडे फिरकला नाही. पावसाळी अधिवेशनात सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयक वगळता इतर कोणत्याच बाबतीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा सूर जुळला नाही. जंतरमंतरवर 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलनावर जमके लाठीचार्ज झाला. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करण्याची आग्रही मागणी विरोधकांनी केली. तर काल अमित शाह यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली. पण काल आणि आजही विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही असा भाजपचा आरोप आहे.

DMK ची कोणती खेळी?

INDIA गोटातील द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष मात्र चहा पार्टीसाठी जातीने हजर होता. खासदार कनिमोळी करुणानिधी हजर होत्या. काँग्रेसने तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूकीनंतर जोसेफ विजय यांच्या सरकारसोबत जाण्याचा निर्णय डीएमकेला खटला आहे. तेव्हापासून पक्ष सातत्याने काँग्रेसशी फटकून वागत आहे. डीएमकेने काँग्रेससोबतची आघाडीही तोडली आहे. अद्याप हा पक्ष अधिकृतपणे एनडीएमध्ये सहभागी झाला नाही. पण मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर कदाचित या पक्षाने होकार भरल्याचेच हे संकेत मानले जात आहे. यामुळे दक्षिणेतील या विधेयकांना होणारा टोकाचा विरोध कदाचित मावळल्याचा दावाही करण्यात येत आहे. पण परदेशी निधी सुधारणा विधेयकाबाबत डीएमकेची भूमिका काय असेल यावर पुढील वाटचाल अवलंबून आहे. मतदारसंघ पुनर्रचना ही न्यायसंगत व्हावी अशी मागणी डीएमकेने केली आहे. दक्षिणेतील राज्यांची चिंता लक्षात घेते एनडीएने या राज्यातील लोकसभा जागा वाढवण्याचे संकेत अगोदरच दिलेले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in