• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थलपती विजय यांच्या शेवटच्या सिनेमामुळे मुलाचं वाढलं टेन्शन; सर्व तयारी केल्यानंतर ऐनवेळी बसला फटका?

July 14, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. सात महिन्यांच्या संघर्षानंतर या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळालं असून अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एकीकडे थलपती विजय आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, तर दुसरीकडे यामुळे त्यांचा मुलगा जेसन संजयचं टेन्शन वाढलं आहे. कारण ‘जन नायकन’च्या प्रदर्शनामुळे जेसन संजयच्या पदार्पणातील चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे ‘जन नायकन’ हा थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असून यामुळे त्यांच्या मुलाच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं जाऊ शकतं.

‘जन नायकन’ या चित्रपटाला बऱ्याच प्रतिक्षेनंतर सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. येत्या 24 जुलै रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. थलपती विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड क्रेझ पहायला मिळतेय. राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करणार नसल्याचं विजय यांनी जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे विजय यांचा मुलगा जेसन संजय हा लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेता संदीप किशनची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिग्मा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. मात्र आता थलपती विजय यांच्या ‘जन नायकन’ या चित्रपटामुळे मुलगा जेसन संजयच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवती टेन्शन वाढलंय.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार जेसन संजयचा ‘सिग्मा’ हा चित्रपट आता 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार नाही. ‘जन नायकन’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट तेव्हाच सिनेमागृहांमध्ये असल्याने ‘सिग्मा’चं प्रदर्शन ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे. लायका प्रॉडक्शन्सचे प्रमुख कुमारन यांनी त्यांच्या चित्रपटाचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

जेसन संजय हा विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोरनलिंगम यांचा मुलगा आहे. संजयने त्याच्या वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांसोबत त्याचे आधीपासूनच काही वाद असल्याचीही चर्चा आहे. संगीता यांनी विजय यांच्याशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांची पत्नी किंवा मुलं त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमात दिसले नाहीत. तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनचंही नाव थलपती विजय यांच्याशी जोडलं जात असल्यामुळे तो नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in