• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो गोरे येडXX आहे… संजय राऊतांची जीभ घसरली; ते विधान झोंबलं

August 1, 2026 by admin Leave a Comment


उद्धव ठाकरे आगामी निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वात लढतील, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल केली होती. या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरली. मीडियाने गोरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताच राऊत यांनी गोरे यांना शिवी हासडली. यावेळी त्यांच्या संतापाचा पारा चढला होता. सर्वात आधी दीपकेंना पाठिंबा देणारे आम्हीच होतो, असं सांगतानाच तुमचं काय जळतंय ते पाहा. तरुणांनी तुमच्या पक्षाला गुडघ्यावर आणलं, असा हल्लाच राऊत यांनी चढवला. ते मीडियाशी संवाद साधत होते.

गोरे येडXX आहे तो. काय आहे. अभिजीत दीपकेने तुमच्या पंतप्रधानांना गुडघे टेकायला लावले. दीपकेंमुळे अमित शाह आणि पंतप्रधान बिळात दडून बसले आहेत. दीपकेला सर्वात आधी आम्ही पाठिंबा दिला. हा तरुण भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सातारचं प्रतिनिधीत्व करताय. काही तरी भान ठेवा, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आम्ही कधी माफी मागितली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक व्हिडिओ शेअर करून त्यांना शिव्या देणाऱ्या तरुणांना माफ केल्याचं जाहीर केलं. त्यावरूनही राऊत यांनी टीका केली. हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मूळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितली नाही. आम्ही कुणी मागितली का? साहेब माफ करा, आम्ही चुकलो, असं म्हटलं का? ही आवदसा आठवली कुठून? आम्ही मागितली का माफी? हे भ्रमिष्ट झाले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने भरकटलेले आहेत. त्यांनी सल्लागार बदलावे. त्यांची मानसिक स्थिती बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासत आहात, असा सवाल त्यांनी केला.

दुसऱ्यांनाही आयाबहिणी

कुणाला 50 करोड गर्लफ्रेंड म्हणाला, जर्सी गाय म्हणाला. तुम्ही दुसऱ्यांची आईबहीण काढली होती. हे विसरता तुम्ही? तो तरुणांच्या भावनाचा उद्रेक होता. तुम्ही विसरला काय बोलला ते? याच मुलांच्या मदतीने तुम्ही सत्तेवर आला होता. राज्यकर्त्यांना त्यांच्या लायकीनुसार शिव्या मिळत असतात. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष अमित शाह आणि मोदींनी फोडला. तेव्हा आम्हाला दु:ख झालं नाही? बाळासाहेबांचा पक्ष फोडता? काहीच वाटलं नाही? असा सवालही त्यांनी केला.

चंद्रकांतदादा महान वैज्ञानिक

चंद्रकांतदादा हे दगडाचे ठसे घेणार आहेत. त्यांना अमित शाह यांनी काम दिलं आहे. दगड गोळा करायचं. चंद्रकांतदादा चार ट्रक दगड गोळा करणार आहे. दादांना जबाबदारी दिली आहे. चंद्रकांतदादा पाटील महान वैज्ञानिक आहेत. त्यांच्यापुढे डॉ. अब्दुल कलाम हे मागे पडले. आता कलाम यांना लोक विसरतील. कलाम यांच्यानंतर चंद्रकांत दादांना विज्ञानातील पुरस्कार दिला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in