• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

डोनाल्ड ट्रम्प यांनी मला… भारत अमेरिकेच्या संबंधांवर मोठा दावा, गोर यांनी थेट..

September 7, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर अमेरिकेने 200 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. इराण आणि अमेरिका युद्धात रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने सूट दिली. त्यातच पुन्हा भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यातच आता अमेरिकेचे दूत सर्जिओ गोर यांनी मोठे विधान केले. ते बंगलुरूमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठे विधान केले.

गोर यांनी म्हटले की, 250 वर्षे पूर्ण होणे ही नक्की साजरे करण्याची बाब आहे. मला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भूतकाळाचा आढावा घेण्यासाठी भारतात पाठवले नाही. तर मला काम करण्यासाठी भविष्याकडे पाहण्यासाठी इकडे पाठवले आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील सामान्य लोकांसाठी ठोस परिणाम साध्य करणे आणि दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल, हे लक्ष आहे. 

गोर यांच्या मते बेंगलुरू सर्वात चांगले ठिकाण आहे. कारण येथे शहर तयार होतंय. हे एक पूर्ण काम आहे. येथे मी प्रत्येक दिवस आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आठवड्यात आम्ही दोन्ही देशाच्या फायद्याचा विचार करतो. भारत आणि अमेरिकेची भागीदार अत्यंत फायदेशीर राहिलं, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर मोठा टॅरिफ लावला जात होता तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप जास्त चांगले मित्र असल्याचे सांगताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले.

मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबात भरोसा नाही. डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगताना दिसतात, तर दुसरीकडे भारताबद्दल धक्कादायक विधान करतानाही दिसतात. आता पुन्हा भारतावर अमेरिका टॅरिफ लावू शकते, असे सांगितले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 8 चौकार षटकार…! शुबमन गिलचा या संघात धमाकेदार डेब्यू, 21 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा
  • भारताचा मोठा निर्णय, जग बघतच राहिले, थेट इतके लाख कोटींची..
  • मोठी बातमी! बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना, कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत
  • रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी कुठे जावे लागले, भरत गोगावले यांची मोठी टिप्पणी..
  • जगाच्या नव्या नकाशाने नवा वाद, भारत चीन सीमेवर या गंभीर चुका..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in