• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी कुठे जावे लागले, भरत गोगावले यांची मोठी टिप्पणी..

September 7, 2026 by admin Leave a Comment


रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाला आता नवं वळण मिळालं आहे. रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून मिश्किल टिप्पणी केली आहे. रायगड पालकमंत्री पदाचं डिक्लरेशन घेण्यासाठी मला आग्र्याला जावं लागलं, अशी मिश्किल टिप्पणी गोगावले यांनी केली. रायगडचं पालकमंत्रिपद मागील काही महिने रिक्त होतं. अखेर भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. मात्र, या नियुक्तीनंतर महायुतीतील अंतर्गत श्रेयवाद पुन्हा समोर आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे सेना विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच, आमदार महेंद्र दळवी यांनी यापूर्वी मागील दीड वर्ष पालकमंत्रीपद सुनील तटकरे यांनी अडवून ठेवल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आता भरत गोगावले यांच्या आग्रा आणि डिक्लरेशनच्या मिश्किल टिप्पणीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, आदिती तटकरे यांच्याकडूनही पालकमंत्रिपदासाठी दावा केला जात होता. महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद बघायला मिळाला.

राज्यात सत्तास्थापन करून अनेक दिवस झाल्यानंतरही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटताना दिसत नव्हता. अखेर भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाने नाशिकच्या पालकमंत्रिपद सोडले. गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भरत गोगावले त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यातच आता त्यांनी रायगडचे पालकमंत्रिपद आणि आग्र्याचा उल्लेख केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना काही दिवसांपूर्वीच गोगावले यांनी म्हटले की, शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर समाजाला फायदा झाला असता. विखे पाटलांनंतर मंत्री भरत गोगावले यांनीही शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ज्यावर आजच जरांगे यांनी उत्तर दिले. त्यांनी थेट म्हटले की, हे लोक शरद पवारांनी काय केले काय केले बोलतात तर मग यांनी काय दिवे लावले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
  • तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
  • आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरे, शहरात राहणाऱ्यांसाठी खास योजना
  • शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्व
  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in