• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगाच्या नव्या नकाशाने नवा वाद, भारत चीन सीमेवर या गंभीर चुका..

September 7, 2026 by admin Leave a Comment


संयुक्त राष्ट्रानं मंजूर केलेल्या जगाच्या नव्या नकाशात दाखवलेल्या भारतीय सीमांवरुन वाद तयार झालाय. ह्या नकाशात अरुणाचल प्रदेशआणि अक्साई चीनला भारतीय रेषा आणि चीनी रेषा यांच्यामधील प्रदेश म्हणून दाखवलं गेलंय.दुसरीकडे
चीनच्या पूर्वेकडील सीमेचा भाग भारतीय रेषा म्हणून दाखवण्यात आलाय…  प्रत्यक्ष क्षेत्रफळाच्या प्रमाणानुसार देश आणि खंड जगाच्या नकाशावर दिसावेत, म्हणून ह्या नव्या नकाशाच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रानं. मतदान घेतलं. एकटा अमेरिका सोडल्यास भारतासहीत 164 देशांनी ठरावाच्या बाजूनं मतदानही केलं. मात्र त्यानंतर जो नकाशा समोर आला., त्यावर भारत सरकारनं आक्षेप नोंदवलाय. कारण, भारताचा भुभाग असूनही अरुणाचल, लडाख आणि अक्साई चीनला नकाशात भारतीय किंवा चीनी रेषा अर्थात सीमेचा भाग म्हणून दाखवलं गेलंय.

त्यावर फक्त समान-क्षेत्र प्रतिनिधित्वाच्या तत्त्वासाठी भारतानं नकाशाला पाठिंबा दिला. कोणत्याही विशिष्ट नकाशा, सीमांच्या चित्रणाला मान्यता नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाखसह भारताचा संपूर्ण सार्वभौम प्रदेश भारताच्या अधिकृत नकाशानुसारच दाखवला जावा; कोणतेही चुकीचे किंवा दिशाभूल करणारे चित्रण अस्वीकार्य आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयानं दिलीय.

आपण शाळा, कॉलेज किंवा माध्यमांमध्ये जगाचा जो नकाशा पाहतो., तो प्रत्यक्षात तंतोतत खरा नाही. कारण, विषुववृत्तापासून दूर असलेले देश क्षेत्रफळानं मोठे असूनही नकाशात लहान दिसतात किंवा दाखवले गेले आहेत.
आपण जो आजवर नकाशा पाहिलाय., तो मुख्यत्वे नेव्हिगेशनसाठी बनवला गेलाय., ज्यात दिशादर्शकता अचूक असली
तरी क्षेत्रफळांच्या बाबतीत नकाशात अनेक चुका आहेत. उदाहरण म्हणजे ग्रीनलँड हा नकाशावर आफ्रिकेइतका मोठा दिसतो.

प्रत्यक्षात ग्रीनलँडपेक्षा आफ्रिका 14 पटीनं मोठा आहे. हाच प्रकार भारत, ब्राझिल, इंडोनेशिया यांच्याबद्दलही घडलाय.
प्रत्यक्ष क्षेत्रफळाहून जगाच्या नकाशावर ह्या देशांना कमी जागा देण्यात आलीय. तेच बदल दुरुस्त करण्यासाठी
संयुक्त राष्ट्रानं हा नवीन नकाशा जारी केलाय. मात्र त्यातही अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद बघायला मिळत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in