
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 7 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत तिन्ही सैन्यदलांसाठी सुमारे 1.10 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठा दुजोरा देत, एकूण मंजूर खरेदी प्रस्तावांपैकी सुमारे 98 टक्के खरेदी भारतीय उद्योगांकडूनच केली जाणार आहे.
थलसेनेसाठी केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल अन् न्युक्लियर रेकी वाहने, ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स , हाय मोबिलिटी वाहने आणि सर्वत्र ब्रिजिंग सिस्टीम खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
नौदलाची ताकद वाढवण्यासाठी आरुद्र रडार आणि स्वदेशी मरीन गॅस टर्बाइन्सच्या डिझाइन, विकास आणि खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाची कठीण भूप्रदेशांमधील operational क्षमता, लॉजिस्टिक्स आणि युद्धादरम्यानची सज्जता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.




Leave a Reply