• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ज्येष्ठ अभिनेत्रीची अत्यंत बिकट परिस्थिती, रस्त्यावर दिसली अशा अवस्थेत; अखेर देवासारखा मदतीला धावून आला निर्माता

May 20, 2026 by admin Leave a Comment


आयुष्यात कोणती वेळ कधी येईल काहीही सांगता येत नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं. रस्त्यावर अत्यंत वाईट अवस्थेत दिसली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री साउथ सिनेविश्वातील असून, तिने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका बजावली आहे. अभिनेत्रीचं नाव पावला श्यामला असं आहे… एकेकाळी आलिशान आयुष्य जगणाऱ्या पावला आता आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहे. पावला यांना हृदयाचा विकार आहे. ज्यामुळे त्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या. पण पुरेसे पैसे नसल्यामुळे रुग्णालयाने उपचार करण्यात नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

असं सांगण्यात येत आहे, पावला यांना एका टॅक्सीमध्ये बसून पाठवण्यात आलं. पण ड्रायव्हरने मध्यरात्री पावला यांना रस्त्याच्या कडेला उतरवलं. त्यानंतर पावला रस्त्यावर एकट्याच भटकत होत्या. पावला यांना रस्त्यावर वाईट अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. अशात वेळेत पोहोचत पोलिसांनी पावला यांना आरके फाउंडेशन येथे पाठवलं.

अभिनेत्रीच्या परिस्थितीबद्दल कळताच निर्माते आणि फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष दिल राजू अभिनेत्रीच्या मदतीसाठी देवासारखे पुढे आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर पावला यांचा एका व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. तेव्हा तो व्हिडीओ दिल राजू यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्यांच्या टीमला मदतीसाठी पाठवलं. आता निर्मात्याच्या मदतीने डॉक्टरांच्या संपर्कात राहून, पावला यांच्यावर योग्य उपचार होत आहेत.

पावला यांनी पूर्वीही केलाय आर्थिक परिस्थितीचा सामना…

ही पहिली वेळ नाही जेव्हा पावला आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. अशा संकटांचा सामना त्यांनी यापूर्वी देखील केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावला आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. पूर्वी काही संस्था आणि कलाकारांनी त्यांना मदत केली होती, पण त्यांची प्रकृती अधिक गंभीर झालेली.

व्हिडीओ शेअर करत मागितली मदत

अनेक मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री आणि त्यांची लेक ज्या ठिकाणी राहत होत्या, तेथून त्यांना काढण्यात आलं… त्यानंतर दोघी रस्त्यावर भटकत राहिल्या. दोघी टोकाचं पाऊल उचलत असताना पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि एका चॅरिटी होममध्ये पाठवलं… व्हिडीओमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे का, पावला यांची लेक देखील टीबी या आजाराचा सामना करत आहे. मुलीच्या उपचारासाठी अभिनेत्रीने स्वतःचे सर्व पुरस्कार देखील विकले आहेत.

पावला श्यामला यांचे सिनेमे

पावला श्यामला यांनी चित्रपटसृष्टीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत आणि ‘खडगम’, ‘आंध्रवाला’ आणि ‘वर्षम’ यांसारख्या सिनेमामधील भूमिकांमुळे त्या प्रसिद्धी झोतात आल्या. त्यांच्या सध्याच्या परिस्थितीमुळे, एकेकाळी मोठ्या पडद्यावर चमकलेल्या, पण नंतर कठीण काळातून जाणाऱ्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या दुर्दशेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
  • मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला
  • Anshula Kapoor Wedding : महालासमोर रात्री 1.15 वाजता मागणी घालणाऱ्या कपूर कुटुंबातील मुलीच्या लग्न विधीचे फोटो
  • ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे, भाजपाला फिरवली मतं, अगोदरच सर्वकाही..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in