
Amravati Hospital Fire : बाळा रुग्णालयात दाखल केलं… आता त्याच्यावर उपचार होतील आणि बाळाची प्रकृती स्थिर होईल… हिच अपेक्षा करत अनेक बालकांवर अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. यामध्ये तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून, 39 लहान बाळांना याठिकाणी ठेवलं होतं. शिशुच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयामधील फायर अलार्म यंत्रणाच कार्यन्वित नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
घडलेल्या धक्कादायक घटनेवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खंत व्यक्त केली आहे. ‘अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे.दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे.’
पुढे पालकमंत्री म्हणाले, ‘मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभं असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो…
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे.
आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात.
2022 मध्ये देखली रुग्णालयात लागलेली आग
अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभागात 3 शिशुंचा आगीत होळपळून मृत्यू झाला आहे. 2022 मध्ये देखील या रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील एन आय सी यू मध्ये आग लागली होती. त्यावेळी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालय प्रशासनामध्ये दिरंगाई होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Leave a Reply