• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..

August 24, 2026 by admin Leave a Comment


अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे मोठी आग लागली. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी सर्वजण झोपेतच होते. अचानक साडेतीनच्या दरम्यान एका व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. रुग्णालयामधील फायर अलार्म यंत्रणाच कार्यन्वित नसल्याचा आरोप केला जात आहे. गलथान कारभारामुळे चिमुकल्यांचे जीव गेले. या घटनेनंतर नातेवाईकांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. मोठी खळबळ उडाली. या घटनेत 3 बालकांचा जीव गेला. नवजात शिशू कक्षात लागलेली ही आग वेगाने पसरली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी बालकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काहींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलरच्या स्फोटाच्या आगीत 3 नवजात शिशुच होळळून मृत्यू झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाची पाहणी केली. नवनीत राण यांनी म्हटले की, दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा. रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणेवर ही नवनीत राणा यांनी प्रश्न उपस्थित केला.

फायर ऑडिट झालं होतं की नाही याची माहिती नवनीत राणा यांनी मागितली आहे. नवनीत राणा यांनी फोनवरून साधला आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्यासोबत संवाद. यादरम्यान आमदार रवी राणा यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रवी राणा यांनी म्हटले की, मी सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि इतरांच्या संपर्कात आहे.

यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. त्यावेळी नवीन इमारतीमध्ये रूग्णालय शिफ्ट झाले होते. पुन्हा अशीच घटना घडणे हे दुर्देवी आहे. डॉक्टर, कर्मचारी आणि व्यवस्था यांच्या बेफिकीरपणा असल्याचा मोठा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. अशाप्रकारे नवजात बालकांचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे, या प्रकरणात चाैकशी झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांची ही जबाबदारी होती, ती त्यांनी सांभाळणे अपेक्षित आहे.

आग लागली होती, त्यावेळी मी आणि मुख्यमंत्र्यांनी नवीन इमारतीत सगळ्या व्यवस्था दिल्या. त्रूटी दूर केल्या पाहिजेत, नर्स आणि जे जे डॉक्टर आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे रवी राणा यांनी म्हटले. रवी राणा यांनी थेट डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आरोप केले. यादरम्यान या घटनेनंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की अमरावती येथील आजच्या घटनेने खूप जास्त दु:खी झालो आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in