
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर अख्ख्ये चांदगुडे कुटुंब संपले. हट्ट आणि काैटुंबिक वाद ज्यामुळे कुटुंब उद्धवस्थ झाले. कुणाल चांदगुडे खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यानंतर फक्त आई वडीलच नाही तर समस्त लोक त्याला समजावत होते. तीन तास सर्वजण कुणालची समजूत काढत राहिले. पण कुणाल कोणाचेही ऐकण्यात तयार नव्हता. आईने गयावया केली. त्याच्यापुढे हात जोडले. तिने थोडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला की, कुणाल पाऊले अजून मागे घेत… शेवटी लेकाला अशा स्थिती पाहून बाप पुढे आला. बापाने आपल्या पोटच्या लेकराला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. वडिलांनी लेकाला पकडण्यासाठी त्याचे हातही पकडले. पण त्याचवेळी दुर्देवी घटना घडली आणि कुणाल आणि त्याचे वडील मुरलीधर डोंगरावरून खाली पडले. हे बघून आई संगीता हिने देखील उडी घेतली. हे पाहून उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मुलगा कुणाल चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीत चांदगुडे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यादरम्यान कुणाल हा आयफोनसाठी जिद्द कर असल्याने त्याचे वडिलांसोबत वाद झाल्याचे सांगितले गेले. पण आता चांदगुडे कुटुंबातील कलह पुढे आला. तिघांनी एकत्रच जगाचा निरोप घेतला. मात्र, तिघांचे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारही झाली नाहीत. कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यावर अंत्यसंस्कार छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात झाले.
मुरलीधर यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी जालन्यातील धनगर पिंपळगाव गावात झाले. यादरम्यान चांदगुडे कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. यादरम्यानच आता मोठी अपडेट पुढे येतंय. चांदगुडे कुटुंबातील तिघांचा अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी झाला. पण अस्थिविसर्जन एकाच ठिकाणी झाले.
तिन्ही मृतांचे अस्थिविसर्जन पैठणच्या गोदावरी नदीपात्रात एकत्र अस्थिविसर्जन करण्यात आले. अंत्यविधी वेगवेगळ्या ठिकाणी मात्र अस्थिविसर्जन एकाच ठिकाणी झाले. दोन्ही कुटुंबात वाद असल्याचे दिसतंय. हेच नाही तर दोन्ही बाजूने आरोप केली जात आहेत. मात्र, कुणाल चांदगुडे याच्या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
Leave a Reply