
बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत कथित अफेअरचे आरोप केले आहेत. त्यानंतर दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता गोविंदा आणि कोमलचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोमल आणि गोविंदा आगामी ‘रुपा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मात्र त्यापूर्वीच ती गोविंदासोबतच्या अफेअरच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये गोविंदा एका ठिकाणी जाताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही लोक असल्याचंही दिसतंय. आत आल्यानंतर गोविंदा काही क्षण थांबतो आणि मागे वळून पाहतो. त्यानंतर कोमल येत असल्याचं दिसताच तो पुढे जातो. या व्हिडीओमध्ये दोघं एकत्र दिसत असल्याने सोशल मीडियावर पुन्हा त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठे शूट झाला आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही.
विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये गोविंदा कॅमेऱ्याकडे पाहून हाताने ‘आता रेकॉर्डिंग बंरेकद करा’ असा इशारा करताना दिसत आहे. यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कोमल आल्यानंतर गोविंदा तिच्यासोबत पुढे जाताना दिसतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टाफकडून गोविंदाचं स्वागतही करण्यात येतं.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
सुनीता अहुजाच्या आरोपांनंतर वाढली चर्चा
गोविंदा आणि कोमल यांच्यातील कथिक अफेअरची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. सुनीता अहुजाने यापूर्वी गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. तिने कोमलचा उल्लेख करत गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं होतं. नुकतंच सुनीताने गोविंदाविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली. तिने यामागे गोविंदा आणि कोमल लग्न करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला होता. मात्र असं काहीच घडणार नसल्याचं गोविंदाच्या मॅनेजरने स्पष्ट केलं.
गोविंदाने सुनीताच्या काही वक्तव्यांवर सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती. तसंच त्याने चुकीची किंवा बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. खोट्या आणि एआय जनरेटेड कंटेंटविरोधात त्याने या नोटिशीत इशारा दिला आहे.
Leave a Reply