• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगाला ज्याची प्रतिक्षा होती अखेर ती बातमी आलीच, या दिवशी सुरू होणार स्ट्रेट ऑफ होर्मुज, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट घोषणा

June 3, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूज बंदच आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारा एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी सुरू होणार? याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी सुरू होणार? याची तारीख समोर आली आहे, स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. इराणसोबत अणु कराराबाबत सुरू असलेली अमेरिकेची चर्चा आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी पुन्हा एकदा सुरू होणार? याबाबत अत्यतं मोठी अपडेट डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हटलं ट्रम्प यांनी?

इराणसोबत आमची चर्चा सुरू आहे, परंतु त्यांच्यासोबत करार करण्यास प्रामुख्याने दोन कारणांमुळे विलंब होत आहे. एक म्हणजे इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यामधील संघर्ष, इस्त्रायलकडून सातत्याने लेबनॉनवर हल्ले सुरू आहेत, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मोजतबा खामेनेई यांना या चर्चेत सहभागी होऊ न देणं हे आहे. जाणून बुजून अमेरिकेचा संदेश मोजतबा खामेनेई यांच्यापर्यंत उशिरा पोहचवला जात आहे, त्यामुळे करारामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिलेल्या एका वृत्तानुसार अमेरिकेकडून पुन्हा एकदा अणु कराराबाबत इराणला नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, सध्या इराणकडून या नव्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.

याचसंदर्भात न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. मला वाटतं येत्या 7 सप्टेंबरपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मुज सर्वांसाठी ओपन होईल असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज सुरू होण्यासाठी थोडा उशिर होत आहे, त्यामुळे अमेरिकेचं देखील नुकसान होत आहे, परंतु मला त्याची चिंता नसल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे. काहीही झालं तरी इराणला आम्ही न्युक्लिअर वेपन्स तयार करू देणार नाही, असंही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in