• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा गुलाबजल, जाणून घ्या कंस बनवाल?

July 17, 2026 by admin Leave a Comment


आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बदलत्या ऋतूमध्ये योग्य काळजी नाही घेतली तर तुमची त्वचा खराब होऊ शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गुलाब जल… गुलाब जलचे अनेक फायदे आहेत. संगायचं झालं तर, बरेच लोक बाहेरून गुलाबजल विकत घेतात. पण त्यात बहुतेकदा रसायने मिसळलेली असतात. पण कोणत्याही रसायनांशिवाय घरी नैसर्गिकरित्या गुलाबजल कसं बनवायचं? हे फार कोणाला माहिती नाही. त्यामुळे जाणून घ्या घरीच गुलाब जल कसं तयार करता येआल.  फक्त गुलाबाच्या पाकळ्या, शुद्ध पाणी आणि बर्फाचे तुकडे वापरून घरी सहजपणे रसायनमुक्त गुलाबजल बनवता येतं.

गुलाबजल तयार करण्यासाठी, प्रथम एक वाटी घ्या. एक रुंद वाटी घेऊन तिच्याभोवती गुलाबाच्या पाकळ्या पसरवा. नंतर मध्यभागी एक लहान वाटी ठेवा. गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात बुडतील इतकं पाणी वाटीच्या भोवती ओता. हे पाणी मधल्या वाटीत जाणार नाही याची काळजी घ्या. आता त्यावर ताटाच्या आकाराचे झाकण ठेवा.

वर ठेवलेल्या झाकणावर बर्फाचे तुकडे ठेवा. गॅसची आच मंद करा आणि पाणी व्यवस्थित उकळत असल्याची खात्री करा. आता पाणी उकळत आहे. गुलाबातील सर्व पोषक तत्वे वाफेच्या स्वरूपात वर येतील. झाकणावरील बर्फाचे तुकडे वाफेला थंड करतात, तिचे पुन्हा पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर करतात आणि त्यांचं द्रवीभवन होतं.

ते पाण्याचे थेंब वाटीच्या मध्यभागी ठेवलेल्या भांड्यात पडतात. ते पाणी म्हणजे गुलाबजल. हे 100 टक्के शुद्ध गुलाबाचंं गुलाबजल आहे. गुलाबजल कोणत्याही रसायनांशिवाय अगदी सहजपणे बनवता येते. जर तुम्हाला गुलाब जल बनवून ते लगेच वापरायचं असेल, तर तुम्ही या सूचनांचे पालन केलं पाहिजे.

एका भांड्यात पाणी घालून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि सुमारे 20 मिनिटे उकळवा. गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे कोमेजल्या पाहिजेत आणि पाण्याचा रंग बदलला पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड झाल्यावर ते गाळून एका काचेच्या बाटलीत साठवून ठेवा. तुम्ही त्याचा लगेच वापर करू शकता.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट… नवा नियम काय?
  • Shubman Gill: जरा रोहित आणि विराटकडून शिक काहीतरी… कॅप्टन गिलला असा सल्ला का मिळाला?
  • रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण! या गोष्टी चुकूनही करु नका, भारतात किती वाजता सुरू होईल
  • Ankit Balian: ‘मर्डर मार दे सडक के ऊपर..’ इन्स्टावर गाणं टाकताच 2 तासांनंतर हत्या; 2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग
  • Khelo India: आता खेळाडूंसाठी टँलेंट हंट, युवा खेळाडूंशी मन की बात करताना पीएम मोदींची मोठी घोषणा, काय काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in