• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घुसखोरांना हाकलण्यासाठी बंगालमध्ये सर्वात मोठा निर्णय, भाजपाचे सरकार येताच थेट आदेश जारी; आता होल्डिंग सेंटरमध्ये…

May 24, 2026 by admin Leave a Comment


West Bengal Rohingya Problem : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून अनेक बदल घडत आहेत. येथे भाजपाची सत्ता आली असून मुख्यमंत्रिपदी सुवेंदू अधिकारी विराजमान झाले आहेत. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बांगलादेशातील घुसखोर आणि रोहिंगे हा प्रचाराच्या अनेक मुद्द्यांपैकी एक होता. दरम्यान, आता सत्ताबदल झाल्यानंतर तेथील भाजपा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुवेंदू अधिकारी सरकारने आता रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांना देशबाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठीचे पाहिले पाऊल आता टाकण्यात आले आहे.

नेमका कोणता निर्णय घेण्यात आला?

पश्चिम बंगालमध्ये अवैध पद्धतीने घुसकोरी करणाऱ्या तसेच अवैध पद्धतीने राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे. पश्चिम बंगालमध्ये राहणारे बांगलादेशी तसेच रोहिंग्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी आता विशेष होल्डिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहेत. तसे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. अशा प्रकारचे होल्डिंग सेंटर उभारण्यासाठी सुवेंदू अधिकारी सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निर्देश जारी केले आहेत. त्यासंबंधी गाईडलाईन्सही जारी करण्यात आले आहेत. आपापल्या जिल्ह्यात योग्य ठिकाणी होल्डिंग सेंटर उभारण्यासाठी योग्य जागेचा शोध घ्यावा तसेच याबाबत लवकरात लवकर कारवाई सुरू करावी, असे या आदेशात म्हटलेले आहे.

तोपर्यंत ठेवले जाणार होल्डिंग सेंटरमध्ये

बांगलादेशच्या सीमेशी लागून असलेल्या जिल्ह्यांवर सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. कारण याच जिल्ह्यांमध्ये परदेशी नागरिक अवैध पद्धतीने राहण्याचे प्रमाण जास्त असू शकते. पकडण्यात आलेल्या परदेशी नागरिकांना त्यांची ओळख पटेपर्यंत तसेच ते कोणत्या देशातून आलेले आहेत हे समजून येईपर्यत त्यांना याच होल्डिंग सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

भाजपाने दिले होते आश्वासन

दरम्यान, नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बंगालधील अवैध पद्धतीने राहात असलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पठवून देऊ, असे जनतेला आश्वासन दिले होते. आम्ही सत्तेत आलो तर घुसखोरीला पूर्णपणे थांबवू असे केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी स्पष्टपणे एका प्रचारसभेत सांगितले होते. आता याच आश्वासनाची पूर्तता करण्यास भाजपाने सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा
  • मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध
  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..
  • BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
  • वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in