
पडद्याजवळ अगरबत्ती लावताना विचार करा. पडद्याजवळ कधीच अगरबत्ती लावू नका. जर पडद्याजवळ वारा वाहत असेल, तर अपघात होण्याची शक्यता असते. अगरबत्तीमुळे पडद्याला आग लागू शकते.
पेटलेली अगरबत्ती लाकडी वस्तूवर कधीही ठेवू नका. अगरबत्ती खाली पडून लाकडी वस्तूला आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
घरात प्राणी असतील तर, प्राण्यांजवळ अगरबत्ती लावणे टाळा. अगरबत्तीचा गरम भाग किंवा टोक प्राण्यांना टोचल्यामुळे किंवा भाजल्यामुळे प्राण्यांना दुखापत होऊ शकतं.
पंख्याखाली अगरबत्ती ठेवू नका. पंख्याखाली अगरबत्ती लावल्याने नुकसान होऊ शकते. पंख्याच्या हवेमुळे अगरबत्तीची जळणारी राख किंवा ठिणग्या घरात उडून आगीचा धोका वाढू शकतो.
पूजास्थळी अगरबत्ती सुरक्षित आणि स्थिर ठिकाणी लावावी. ती खाली पडू नये म्हणून अगरबत्ती स्टँड, धातूचे ताट किंवा सिरॅमिक होल्डरमध्ये ठेवावी. लहान मुलांपासून देखील अगरबत्ती लांब ठेवा.




Leave a Reply