• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घटस्फोटानंतर जॉइंट लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

August 31, 2026 by admin Leave a Comment


अनेकजण लग्नानंतर घर घेतात, अनेकदा घरासाठी पती-पत्नीच्या नावानर जॉइंट होम लोन घेतले जाते. मात्र काही वेळा एखादे जोडपे वेगळा होण्याचा निर्णय घेते आणि त्यांचा घटस्फोट होतो. अशा परिस्थितीत घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचे काय होते? त्यानंतर दरमहा EMI भरण्याची जबाबदारी कोणाची असते? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी बँक लोन आणि EMI संदर्भातील नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट घेतल्यानंतर दोन व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या होऊ शकतात. मात्र, केवळ घटस्फोट झाल्यामुळे बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून घेतलेले जॉइंट लोन किंवा आर्थिक करार आपोआप संपत नाही. पती-पत्नीने संयुक्तपणे होम लोन घेतले असल्यास घटस्फोटानंतरही कर्ज फेडण्याची कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी दोघांची असते. दोघांचे वैवाहिक नाते संपले असले तरी बँकेच्या दृष्टीने दोघेही कर्जाचे सह-कर्जदार राहतात.

घटस्फोटानंतर लोन फेडण्यासाठी कोणते पर्याय आहेत?

घटस्फोटानंतर एक पार्टनर घराची मालकी आणि उर्वरित कर्जाची रक्कम स्वतःच्या नावावर घेऊ शकतो. मात्र, यासाठी बँक संबंधित व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत, परतफेडीची क्षमता आणि क्रेडिट स्कोअर तपासेल. दुसरा पर्याय म्हणजे सेटलमेंट. दोन्ही पार्टनर्सच्या परस्पर संमतीने घर विकून त्यातून मिळालेल्या पैशातून बँकेचे उर्वरित कर्ज फेडता येते. कर्ज फेडल्यानंतर काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती दोघांमध्ये परस्पर सहमतीने वाटून घेता येते. दोघांची सहमती असल्यास कर्ज पूर्ण फेडले जाईपर्यंत दोघेही ठरल्याप्रमाणे आपापल्या हिस्स्याची EMI भरत राहू शकतात.

यावरून स्पष्ट होते की घटस्फोटामुळे कर्जाचा झालेला करार आपोआप बदलत नाही. त्यामुळे जॉइंट होम लोन घेताना परस्पर कायदेशीर करार करून घेणे महत्त्वाचे आहे. भविष्यात नातेसंबंध बिघडल्यास किंवा वाद निर्माण झाल्यास EMI कोण भरणार आणि घराची मालकी कोणाकडे राहणार, याचा स्पष्ट उल्लेख या करारात करता येतो. लोन घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि पार्टनरने EMI भरण्यास नकार दिला, तर तुम्ही एकट्याने संपूर्ण EMI भरण्यास सक्षम आहात का, याचा विचार आधीच करणे गरजेचे आहे.

बँक लोन आणि EMI संदर्भातील नियम

बँकेसाठी तुमचा घटस्फोट झाला आहे की नाही, याला विशेष महत्त्व नसते. बँकेचा संबंध लोनच्या परतफेडीशी असतो. कर्ज पूर्णपणे फेडले जाईपर्यंत दोन्ही सह-कर्जदार EMI भरण्यास कायदेशीररित्या जबाबदार राहतात. जर एका पार्टनरने EMI भरण्यास नकार दिला किंवा कर्जाच्या परतफेडीत डिफॉल्ट केला, तर त्याचा परिणाम दोन्ही पार्टनर्सच्या CIBIL स्कोअरवर होऊ शकतो.

एखाद्या न्यायालयाने घटस्फोटाच्या निर्णयात एका पार्टनरला संपूर्ण लोन फेडण्याचे आदेश दिले तरी बँकेच्या नोंदीत दोघेही कर्जदार राहू शकतात. बँकेकडून एका व्यक्तीचे नाव लोनमधून अधिकृतपणे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँक दोन्ही कर्जदारांकडून कर्जाची वसुली करू शकते. त्यामुळे तुम्ही जर जॉइंट होम लोन घेत असाल तर वरील नियम लक्षात घेणे गरजेचे आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CM Devendra Fadnavis | ‘PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत’-फडणवीस
  • गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने लावलंय सर्वांना वेड, सर्वत्र होतंय कौतुक
  • राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?
  • Photo : कागदं फेकले, कांद्याचा ट्रे फेकला, अमित ठाकरेंचा संताप पाहिलात का? पुण्याच्या कॉलेजात फुल्ल राडा!
  • अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in