• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गोविंदाचे फक्त अफेअर्स नाही तर सर्व डार्क सिक्रेट समोर आलेच असते पण…, अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर

July 13, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची बायको सुनीता आहुजा ‘लॉक अप 2’ शोमधून अखेर बाहेर पडली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून सुनीता, गोविंदा याच्या खासगी आयुष्याचा खुलासा करताना दिसून आली. दरम्यान, शोमध्ये देखील तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. अशात प्रकृती ठिक नाही, डायबिटीज आणि मोनोपॉज यांसारखी कारणं सांगत सुनीता हिचा शोमधील प्रवास संपला. गोविंदा आणि मुलगी टिना सुनीता हिला घेण्यासाठी पोहोचले. पण सुनीता शोमधून बाहेर आल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

सुनीताची प्रकृती की गोविंदाचे डार्क सिक्रेट?

सुनीता हिच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सचा असा दावा आहे की, प्रकृती अस्वास्थ हे तिच्या जाण्याचं एकमेव कारण नव्हतं आणि त्यामागे काहीतरी मोठी गोष्ट दडलेली असू शकते. सांगायचं झालं तर, ‘लॉक अप 2’ शोचा एक महत्त्वाचा नियम आहे. शोमध्ये असताना स्पर्धकांवर असे प्रसंग येतात, जेव्हा त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्यातील मोठे सत्य सर्वांसमोर सांगावे लागतात.

याच कारणामुळे आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांचा असा दावा आहे की, जर सुनीता शोमध्ये आणखी काही दिवस राहिली असती. तर तिने गोविंदा याच्याबद्दल अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले असते. ज्याचा परिणाम गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियांवर झाला असता.

असं सांगितलं जात आहे की, याच कारणामुळे गोविंदा स्वतः आपली मुलगी टीनासोबत सुनीता हिला आणायला गेलेला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट्सवरून असं दिसून येतं की, सुनीता हिने केलेल्या विधानांमुळे गोविंदा यांची सार्वजनिक प्रतिमा अलीकडच्या काळात आधीच चर्चेचा विषय ठरली होती. अशा परिस्थितीत, आणखी एखादी नवीन बाब समोर आली असती तर त्यावरून अधिक चर्चा रंगली असती. गोविंदा एका प्रभावशाली कुटुंबातून येतो; तो फक्त एक अभिनेता असण्यासोबतच ते राजकारणी देखील आहे.

गोविंदा – सुनीता अहुजा

गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. सोशल मीडियावर देखील सुनीता हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, सुनीता दिवसागणिक पुढे जात आहे. पण करियरमध्ये पुढे जाण्यासाठी गोविंदा याच्या नावाचा वापर करत आहे… अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in