• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..

June 24, 2026 by admin Leave a Comment


कल्याणमध्ये गुटखा मिळत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. खडकपाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला चार तासात ठोकल्या बेड्या. दुर्गाप्रसाद पांडे असे आरोपीचे नाव असून ओला कॅबचालक तो असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.  गुटखा बंदी झाल्याने संताप व्यक्त करत केला होता व्हिडिओ व्हायरल. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला थेट पोलिसांकडून धडा शिकवण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ करून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध खडकपाडा पोलिसांनी लावला आहे.

या व्यक्तीचे नाव दुर्गाप्रसाद पांडे असे असून तो व्यवसायाने ओला कॅबचालक असल्याचे समोर आले आहे. त्याचा वडिलांची पान टपरी होती, ती टपरी सुद्धा बंद करण्यात आली. त्याला गुटखा मिळत नसल्याने त्यांनी तुकाराम मुंढे राग काढला होता. काही दिवसांपासून गुटखा उपलब्ध होत नसल्याने तो रागात होता. गुटखा मिळत नसल्याच्या रागातून त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ तयार केला.

आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या प्रकरणाची दखल घेत खडकपाडा पोलिसांनी तपास करून दुर्गाप्रसाद पांडे याचा शोध घेतला आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहतो.

खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती आंधळे पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने 4 तासात दुर्गाप्रसाद याला शोधून काढला पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडून कडक कारवाई केली जात आहे. गुटखा पूर्णपणे बंद असल्याने त्याचा संताप झाला होता. तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ करणारा व्हिडीओ त्याने तयार करून शेअर केला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in