• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गँग किंवा चोरट्याने नव्हे तर चक्क एका डॉगीने एक लाख रुपये पळवले – VIDEO

May 24, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक अजब आणि हैराण करणारा प्रकार घडला आहे. या घटनेने स्थानिक लोकही चक्रावले आहे. हा प्रकार शहरातील किल्लेवाली मशिदीच्या जवळ घडला आहे. येथे एका व्यापाऱ्याचे एक लाख रुपये ठेवलेली बॅग एका रस्त्यातील भटक्या कुत्रीने पळवली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्याने सीसीटीव्ही तपासले तेव्हा हा प्रकार त्यात दिसला आहे. या घटनेने संपूर्ण भागात या कुत्रीची चर्चा सुरु आहे.

डॉगी पैशांची बॅग घेऊन पसार झाली

मिळालेल्या माहितीनुसार व्यापाऱ्याने अलिकडेच बँकेतून एक लाख रपये कॅश काढली होती.हा व्यापारी काहीतरी कामासाठी बाजारात गेला होता. याच दरम्यान तो किल्लेवाल्या मशिदीत नमाज पढायला गेला. घाईघाईत त्या पैशाने भरलेली काळी बॅग मोटरसायकलवरच ठेवली आणि तो आत मशिदीत गेला. त्यानंतर ही काळ्या रंगाची डॉगी तेथे आली आणि तिने ही काळ्या रंगाची पिशवी तोंडात धरुन ती पसार झाली.

कोणालाच या घटनेची पत्ता लागला नाही. जेव्हा व्यापारी नमाज पढून बाहेर आला तर बाईकवरुन पिशवी गायब झाल्याची पाहून त्याला धक्का बसला. आधी त्याने आजूबाजूला शोधून पाहिले. लोकांना विचारुन पाहिले मात्र, कोणीच काही पाहिले नसल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा त्यांना धक्का बसला. फुटेज मध्ये जे दिसले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यात स्पष्ट दिसत होते की एक काळी डॉगी तेथे बाईकच्या जवळ आली, तिने बॅग तोंडात धरली आणि हळूहळू चालत ती तेथून निघून गेली.

येथे व्हिडीओ पाहा –

सोशल मीडिया पर एक सीसीटीवी फुटेज वायरल हो रहा है। फुटेज में एक काले रंग का कुत्ता नोटों से भरा बैग लेकर भागते दिख रहा है। फुटेज बिजनौर जिले का बताया जा रहा है। pic.twitter.com/vW9jUCHGhC

— Dinesh Rathour Journlist (@DineshRathour8) May 24, 2026

डॉगी आणि पैसे दोन्ही गायब

सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोक या प्रकाराला एक अविश्वसनीय घटना म्हणत आहेत. काही लोकांनी या हलगर्जीपणा म्हटले आहे. डॉगीला या पिशवीत काही तरी खायला मिळेल यामुळे तिने ती नेली असावी असे काही जण म्हणत आहे. तर काही जण याला नशीबाचा खेळ म्हणत आहेत. व्यापारी आणि स्थानिक लोकांनी अनेक जागांवर या बॅगेचा शोध घेतला.परंतू आतापर्यंत या बॅगेचा कोणताही ठाव ठिकाणा कळालेला नाही. पोलीसांना देखील या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.आजूबाजूच्या क्षेत्रात बॅगेचा तपास केला जात आहे.

 





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in