• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं; दमदार रेटिंगचा सस्पेन्स थ्रिलर ओटीटीवर होतोय ट्रेंड

July 15, 2026 by admin Leave a Comment


ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘धुरंधर 2’ ते ‘इक्का’पर्यंत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना ओटीटीवर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यात एक असाही सस्पेन्सने भरलेला चित्रपट आहे, जो हॉरर जॉनरमधील असून त्याचा क्लायमॅक्ससुद्धा दमदार आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील रंजक वळणं, कलाकारांचा अभिनय तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. विशेष म्हणजे आयएमडीबीवरही या चित्रपटाला दहापैकी उत्तम रेटिंग मिळाली आहे.

कथा काय?

या चित्रपटाच्या कथेची सुरुवात बालपणीच्या चार मित्रांपासून होते. त्यापैकी एक मुलगी इतरांना सांगते की, कशाप्रकारे तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केली आणि आता तिची आत्मा भटकतेय. तिचे इतर चार मित्र तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि आत्मासारखी कोणती गोष्ट नसते, असं ते म्हणतात. त्यानंतर हळूहळू ते चारही मित्र मोठे होतात. त्यांच्यापैकी एका मुलीच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या छोट्या मुलीसोबत धक्कादायक घटना घडते. तिच्यात दुसऱ्या आत्माने प्रवेश केल्याचं म्हणत तिला मारलं जातं. या मारहाणीत त्या मुलीचा मृत्यू होतो. ही घटना पाहून ती मुलगी तिच्या इतर तीन मित्रांसोबत ढोंगी बाबांचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेते.

या प्रवासात ती आणि तिचे मित्र अनेक ढोंगी बाबांच्या चेहऱ्यावरील पडदा उचलते आणि सत्य समोर आणते. पण अचानक एकेदिवशी तिला इंटरनेटवर एका अशा न्युरोलिस्टबद्दल वाचायला मिळतं, तो सर्वकाही सोडून एक बाबा बनतो आणि आत्मांना पळवून लावण्यासाठी काम करतो. या चारही मित्रांना तोसुद्धा एक ढोंगीबाबा वाटतो आणि त्याचीही पोलखोल करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मात्र अखेरीस एक असा ट्विस्ट येतो, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ट्विस्ट आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटाचं नाव ‘ईशा’ असं आहे.

2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा तेलुगू ड्रामा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. श्रीनिवासने याची कथा लिहिली असून सध्या हा चित्रपट जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवरही बघू शकता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता आणि आयएमडीबीवर त्याला दहापैकी 7.2 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये त्रिगुण, हेबाह पटेल, अखिल राज, सिरी हंमंथ, बबलू पृथ्वीराज आणि मिमे मधु यांच्या मुख्य भूमिका आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?
  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in