
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विविध ठिकाणी आज सोमवारी 125 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक नेते त्यांना अभिवादन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना अभिवादन केलं. पीएम मोदींनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांचं जीवन, विचार, राष्ट्र निर्माणासाठी दिलेल्या योगदानासाठी मोदींनी पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, डॉ. मुखर्जी यांनी भारताची एकता, प्रतिष्ठा, प्रगतीसाठी आयुष्य समर्पित केलं. भारताची अखंडता ठेवणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं ध्येय होतं. 2019 मध्ये कलम 370 आणि 35अ हटवणे हीच त्यांच्या कार्यासाठी दिलेली योग्य श्रद्धांजली आहे. त्यांचं कार्य आणि बलिदान राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे’.
Today, on the 125th Jayanti of Dr. Syama Prasad Mookerjee, I bow to one of India’s most remarkable nation-builders, whose life was defined by scholarship, courage and an unwavering commitment to national service. He dedicated himself to the cause of India’s unity, dignity and…
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2026
पंतप्रधान मोदींकडून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींच्या आठवणींना उजाळा
‘जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याला त्यांचा विरोध होता. 2019 साली कलम 370 आणि 35A मध्ये हटवणे हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी श्रद्धांजली होती. डॉ. मुखर्जी हे शहाणपण, लोकसेवेचे संगम होते, असे त्यांनी सांगितले. ‘शिक्षणतज्ज्ञ आशुतोष मुखर्जी यांनी सुखसोयीचा त्याग करून जनसेवेचा मार्ग निवडला. मुलगा आणि पत्नीच्या निधनानंतरही त्यांनी राष्ट्रसेवेचा निर्धार केला होता. पुढे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगाल भारताचा अविभाज्य भाग राहील, यावर भर दिला होता. तसेच जम्मू आणि काश्मीरबाबतही तोच विचार होता, असे मोदींनी पुढे सांगितले.
‘डॉ. मुखर्जी हे कोलकाता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू होते. त्यांनी वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन दिलं. तसेच त्यांनी कृषी शिक्षण, शिक्षण प्रशिक्षण यास प्रोत्साहन दिलं, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी डॉ.मुखर्जी यांच्या विचाराचा संदर्भ देत म्हणाले की, ‘शैक्षणिक संस्थांना भविष्यातील क्लर्क आणि कमी पगारावर काम करणारे कर्मचारी तयार करण्याचे कारखाने समजणे चुकीचे आहे. नेतृत्व करण्यास सक्षम असणारे विद्यार्थी घडवले पाहिजे’. तसेच मोदींनी मंत्रिपदाचा कार्यकाळ, आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न, जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेले वैचारिक मतभेद यावरही भाष्य केलं.
Leave a Reply