• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कधी अश्लील डान्स, तर कधी ‘भाभी पॉर्न…’, Bigg Boss विनर गौरव खन्नाची बायको वादाच्या भोवऱ्यात, लवकरच होणार घटस्फोट

June 29, 2026 by admin Leave a Comment


‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची बायको आकांशा चमोला हिने ‘लॉक अप सिझन 2’ शोच्या सुरुवातीलाच खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. गौरव याच्यासोबत लवकरच घटस्फोट होणार असं आकांशा हिने सांगितलं आहे. दोघे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत आहेत. एवढंच नाही तर, ‘आमच्या नात्यात आता पती – पत्नीसारखं काहीही राहिलं नाही…’ असं देखील आकांशा हिने सांगितलं आहे. ‘लॉक अप सिझन 2’ मध्ये आकांशा हिने तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल देखील मोठा खुलासा केला. ज्यामुळे ती कायम ट्रोल होत असते. आकांशा म्हणजे, ‘मला कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही. ज्यामुळे लोकं माझा तिरस्कार करतात… शोनंतर तिच लोकं माझ्यावर प्रेम करतील…’

आकांशा म्हणाली, ‘अनेकांना माझ्याकडून अडचणी आहेत. लोकं मला म्हणतात की मी प्रचंड अटेंशन सिकर आहे. मी प्रसिद्धीची भुकेली आहे… मी माझ्या नवऱ्याच्या प्रसिद्धीचा फायदा उचलते. मला आई व्हायचं नाही. मी भाभी पॉर्न केलं आहे…’, आकांशा हिचं वक्तव्य ऐकल्यानंतर फराह म्हणाली, ‘192 देशांमधील जनता आणि येथील सर्व कॅमेरे फक्त तुला पाहत आहेत आणि त्यांना माहिती करून घ्यायचं आहे की, हे सर्व आरोप तू कसे साफ करतेस…’, पुढे आकांशा म्हणाली, ‘मी देखील एक अभिनेत्री आहे आणि गौरव खन्ना याची पत्नी असणं हा माझ्या आयुष्यातील एक वेगळा भाग आहे…

सांगायचं झालं तर आकांशा तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत असते. जे लोकांना अश्लील वाटतात. तिच्या व्हिडीओ अनेकदा वादग्रस्त परिस्थिती देखील उभी राहिली आहे. सध्या आकांशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जानेवारी 2026 मध्ये तिने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं, ‘केवळ गरजांवर आधारलेल्या नात्यात हृदयाचा नेहमीच बळी दिला जातो.’, या पोस्टनंतर सोशल मीडियावर आकांशा आणि गौरव यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.

जेव्हा गौरवने ‘बिग बॉस’मध्ये सांगितले की त्याला बाप व्हायचं होतं पण त्याच्या पत्नीला मूल नकोय आणि परिणामी, त्याने स्वतःचे सुख बाजूला ठेवून पत्नीच्या इच्छेनुसार वागायचं ठरवलं. तेव्हा दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आकांशा आणि गौरव यांचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in