
शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात 6 खासदारांनी प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश होता. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत शिंदेंची साथ दिली. मात्र, यादरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांनी वडिलांचा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, याकरिताच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप झाला. मात्र, प्रत्यक्षात ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने हा निकाल लागला नाही. पुराव्या अभावी आरोपींची सुटका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर सतत चर्चेत असलेले खासदार आहेत. त्यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यानंतरही ओमराजे निंबाळकर काही दिवस सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर फॉलो करताना दिसले.
आता ओमराजे निंबाळकर यांनी मोठा निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे पिता पुत्रांना अनफॉलो केले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. थेट 35 हजार फॉलोवर्स त्यांचे सोशल मीडियावर कमी झालेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी घट होताना दिसतंय.
पक्षांतर केल्यापासून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे 35 हजार फॉलोवर्स कमी झाले आहेत. ठाकरे पिता पुत्रांना
अनफॉलो करणारे खासदार ओम राजे जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना मात्र फॉलो करतात. त्यांच्या चांगली मैत्री आहे. त्यांनी पक्ष सोडला पण आपली मैत्री ही कायम ठेवली आहे. आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची मैत्री तर सर्वत्र चर्चेत राहिली आहे.
पण आता अखेर ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी अनफॉलो केले. पण ठाकरे गटातील आमदारांना फॉलो करणे कायम ठेवले. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अनफॉलो त्यातच त्यांच्या फॉलोवर्समध्ये झपाट्याने कमी होताना दिसत आहे. काहींनी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर नाराजीही जाहीर केली होती.
Leave a Reply