• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉयफ्रेंडचा कोयत्याने हल्ला, बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

August 26, 2026 by admin Leave a Comment


बॉयफ्रेंडने कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे बड्या सरकारी महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना पालघर येथे घडली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय स्नेहल सावंत या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पण गेल्या तीन महिन्यापासून मत्यूशी झुंज देत होत्या आणि त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सुरुवातीला त्यांच्यावर बोईसर येईल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु असताना मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्नेहल यांच्या बॉयफ्रेंडचं नाव अमोल मुळे असं आहे.

आता स्नेहल सावंत यांच्या निधनानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, 12 जून 2026 रोजी सायंकाळी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात अमोल मुळे याने स्नेहल सावंत यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्रथम बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्यात हलवण्यात आले होते.

मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील रुबी रुग्णालयात 3 आठवडे उपचार केल्यानंतर सातारा शहरात असणाऱ्या पल्स रुग्णालयात मागील महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्नेहल यांच्यावर कोयत्याने वार केल्यानंतर आरोपी अमोल मुळे फरार झाला. अशात घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेरने शोध घेत, त्याला अटक केली होती. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास कसून करत आहेत. स्नेहल सावंत यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच परिसरात शोककळी पसरली आहे. एवढंच नाही तर, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण देखील आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि स्नेहल यांच्या कुंटुबाला न्याय मिळावा.. अशी मागणी सर्वत्र होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”
  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in