• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच

August 26, 2026 by admin Leave a Comment


पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये देखील वा़ढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप जमिनीवर मुक्तसंचार करताना दिसून येतात. अशावेळी त्यांना थोडा जरी धोका जणावला की ते लगेच तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांपासून सतर्क राहणं गरजेचं असतं. भारतात सर्व साधारणपणे सापांच्या चारच विषारी प्राजाती आढळू नयेतात. त्यामध्ये मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे या सापांच्या प्रजातींचा समावेश होतो. विशेष म्हणजे या चारही प्रजाती महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं आढळून येतात. काही सापांच्या प्रजाती या थोड्या देखील विषारी नसतात. परंतु आपल्या मनात असलेल्या भीतीमुळे आपण या सापांना मारतो. त्यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या भारतामधून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला जर कधी साप दिसलाच तर त्याला मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यु करून सुरक्षित स्थळी सोडतील.

दरम्यान सापांपासून आपलं संरक्षण कसं करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी विविध उपाय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे. पावसाळ्याच्या काळात उगणाऱ्या गवताला प्रतिबंध घालणे, तसेच जर तुमच्या घराच्या आसपास उंदिर घुशीसारखे प्राणी असतील तर त्यांना प्रतिंबंध घालणे या सारखे उपाय तुम्हाला करता येऊ शकतात. कारण जिथे उंदिर आहेत, तिथे साप आपल्या भक्ष्याच्या शोधात येत असतो. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो.

जंगलामध्ये राहणारे आदिवासी लोक पारंपरीक पद्धतीने सापांपासून आपलं संरक्षण करतात. मोहाचं झाड हे आदिवासी लोकांसाठी एकप्रकार कल्पवृक्षच आहे. मोहाच्या झाडाचा विविध प्रकार उपयोग करून आदिवासी लोक आर्थिक प्राप्त करतात. सोबतच मोहाच्या झाडाचं खोड सापांना घरात घुसण्यापासून प्रतिबंध देखील करू शकतो. जर घरात साप घुसला आहे, किंवा परिसरा साप आहे, असं जर या लोकांना वाटलं तर हे लोक मोहाच्या झाडाची वाढलेली साल जाळतात. या धुराचा आणि वासाचा सापांना त्रास होतो. त्यामुळे ते जर तिथे असतील तर ते तेवढा परिसर सोडून दूर निघून जातात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”
  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in