
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जे गरजू लोक आहेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यामाध्यमातून आपल्याला पुण्य तर मिळतंच, पंरतु आपण जशी एखाद्याला मदत करतो, तशीच मदत आपल्याला इतर लोकही करत असतात. परंतु आपण मदत कोणाकडून घेतली पाहिजे याचे देखील काही नियम आहेत. जर तुम्ही चुकीच्या लोकांकडून मदत घेतली तर आयुष्यभर त्यांच्या उपकाराचं ओझ तुमच्या डोक्यावर राहील आणि तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
स्वर्थी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही करा, कशीही परिस्थिती येऊ द्या, परंतु जे स्वार्थी मित्र आहेत, त्यांच्याकडून आयुष्यात कधीही मदत घेऊ नका. कारण असे मित्र कायम त्यांचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच तुमची मदत करत असतात. त्यामुळे आज त्यांनी तुम्हाला मदत केली, उद्या तुम्ही देखील त्यांची मदत कराल ही त्यांना अपेक्षा असते, ते तुम्हाला केलेल्या मदतीच्या बदल्यात कितीतरी अधिक पटीने तुम्याकडून त्यांचा फायदा करून घेतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांना कधीही मदत करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
वांरवार बोलून दाखवणारे लोकं – काही लोक हे तुम्हाला मदत तर करतात, परंतु ती गोष्ट ते अनकांसमोर बोलून दाखवतात. कधी-कधी तर ते तुमच्या तोंडावर बोलण्यास देखील मागे-पुढे पहात नाहीत, त्यामुळे तुमच्यावर अपमानाची वेळ येऊ शकते.
वाईट कर्म करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक वाईट कर्म करतात, अशा लोकांकडून तुम्ही कधीही मदत घेतली नाही पाहिजे. यामुळे तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply