
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कामाचा स्ट्रेस, आर्थिक बाबी, कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नसल्यामुळे होणारे वाद आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपेल आयुष्य टेन्शनने भरलेले असते. पण एका जपानी टेकनीक जर आपण आमलात आणली तर आनंदाने आयुष्य जगता येते. चला जाणून घेऊया त्याविषयी…
जपानी टेकनीकमध्ये सांगितले आहे की व्यायाम केल्याने स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे दिवसभरातून थोडा वेळ काढून व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकता मिळवण्यासाठी ध्यान करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आवर्जुन मेडिटेशन करावे.
आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारचे जंक फूड खात असतो. पण या जंक फूडचा शरीरावर मोठा परिणाम होता. त्यामुळे हे जंक फूड न खाता चांगला सकस आहार करावा.
आपल्या आयुष्यात नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार करणारे मित्र असावेत. अशा मित्रांसोबत राहिल्याने आयुष्यात कायम सकारात्मकता राहते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply