
Sneha Wagh : मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारच चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला. अशात तिसरं घटस्फोट झाल्यानंतर स्नेहा दुसरं लग्न करणार का? अशा चर्चांना देखील उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, स्नेहा हिच्या आयुष्यात दोन्ही नाही फार काळ टिकली नाहीत. 2026 पासून स्नेहा एकटीच राहते… अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्नेहा हिने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
स्नेहा हिला विचारण्यात आलं की, भविष्यात पुन्हा लग्न करणार का? स्नेहा वाघ म्हणाली, ‘लग्न आता माझं बिलकूल प्राधान्य नाही. याचा अर्ध मी कधी लग्न करणार नाही असा होत नाही. मी लग्न करणार नाही असा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण मी स्वतःभोवती एक मर्यादा ठरवलेली आहे…’, असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे स्नेहा म्हणाला, ‘आता माझं लक्ष लग्नावर नाही. जेव्हा आपण लग्नासारख्या गोष्टींना अधिक महत्त्व देत नाही. तेव्हाच आपण पुढे जातो. भविष्यात माझं लग्न होईल याबद्दल मी खात्री देऊ शकत नाही…’, एवढंच नाही तर कृष्ण भक्तीत रमलेली स्नेहा म्हणते, ‘मला आता कोणत्या माणसासोबत नात्यामध्ये राहण्याची गरज वाटत नाही. कारण कृष्णाने माझ्या आयुष्यातील पोकळी भरुन काढली आहे.’
‘मी आता समाधानी आहे आणि मला यातून बाहेर पडायचं नाही. एक काळ असा देखील जेव्हा मला कोणावरच विश्वास नव्हता. प्रत्येक जण स्वार्थी आहे, असंच मला वाटत होतं. अखेर मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला….’ असं देखील स्नेहा वाघ म्हणली.
स्नेहा वाघ हिची दोन लग्न
स्नेहा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 19 व्या वर्षी तिने पहिलं लग्न अविष्कार दार्वेकर सोबत केलं. मात्र या नात्यात ती कौटुंबिक अत्याचाराचला बळी पडली. यानंतर तिने 2015 मध्ये अनुराग सोळंकी याच्यासोबत लग्न केलं. पण तिचं दुसरं लग्न देखील टिकलं नाही. अखेर तिने दुसऱ्या नवऱ्यापासून देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Leave a Reply