• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rohit Pawar : 40 लाख रुपयांना पेपर फोडला, रोहित पवार यांचा MPSC पेपर फुटीवर खळबळजनक दावा

August 26, 2026 by admin Leave a Comment


MPSC पेपर फुटीनंतर आयोगाने औषध निरीक्षक गट-ब पदासाठीची भरती रद्द केली आहे. रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी आज MPSC च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “राजकारण फार वंगाळ, यात शिरु नका. तुमचे प्रश्न मी मांडतो तेव्हा मला तुमच्यात उद्याचे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तलाठी, ड्रग निरीक्षक हे अधिकारी आम्हाला दिसत असतात. राजकारणात आम्ही आमदार बनण्यासाठी आलेलो नाही. खूप काही करायचय या देशासाठी, राज्यासाठी. हे राजकारण, समाजकारण करत असताना चांगले अधिकारी असणं गरजेचं आहे” असं रोहित पवार म्हणाले. “तुमच्या माध्यमातून मी प्रामाणिक अधिकारी पाहतो. चांगले, प्रामाणिक अधिकारी पाहिजे असतील तर ते ज्या प्रक्रियेतून तयार होतात, ती प्रक्रिया स्वच्छ असली पाहिजे” असं त्यांनी सांगितलं.

“मला माहितीय तुम्ही कसे राहता, आंघोळ करता. तीन तास झोपता, पोहे खाल्ले म्हणजे जेवण यावर दिवस काढता, महिने काढता. मुलीची परिस्थिती फार वेगळी आहे. फक्त एक-दोन संधी मिळतात, मग लग्नाची चर्चा. अशा वातावरणात शिकत असताना आधी चहा तीन-चार रुपयांना मिळायचा. आत्ता 12-15 रुपयांना मिळतो. महागाई वाढली आहे. दहावर्षापूर्वी पोहे पाच ते सात रुपये होते. आता 35 रुपये” असं रोहित पवार म्हणाले. “तुम्ही ज्या कुटुंबातून येता, शेतकरी परिवारातील मुलं आहात. 10-12 वर्षापूर्वी सोयाबीन, कपासीचे जे भाव होते ते आजही आहेत. कांद्याच्या भावासाठी संघर्ष करावा लागतोय. शेतकऱ्यांची अशी स्थिती असताना शेत मजुराची काय अवस्था असेल?. आज उत्पन्न वाढत नाहीय. आई-वडिल आपली स्वप्न मारुन कुठूनतरी तुमच्या शिक्षणासाठी पैसा गोळा करतात. तुमचं स्वप्न हे तुमचं नसून आई-वडिलांचं स्वप्न आहे” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

40 लाख रुपयांना पेपर विकला

“आम्ही आयोगाला भेटलो होतो की हा पेपर फुटला आहे. अनेक लोकांना आम्ही भेटून विनंती केली होती की याबाबत आम्ही पुरावे दिले आहेत, याचे प्रश्न आधीच फुटले होते. MPSC नाही म्हणत होते, पण पुरावे आम्ही दिले होते याचा तपास झाला. Mpsc ने मान्य केलं आहे की पेपर फुटला आहे. अनेक लोक यात आहेत fir झाला आहे. १९९७ ला पेपर पहिल्यांदा फुटला होता आणि त्यावेळच्या अध्यक्षांना जेलमध्ये टाकलं होतं” असं रोहित पवार म्हणाले.

“अधीक्षकांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे. हा तपास आणि FIR पब्लिक करावा ही मागणी आहे” असं रोहित पवार म्हणाले. “40 लाख रुपयांना पेपर विकला गेला आहे” असा आरोप रोहित पवार यांनी केला. “अध्यक्ष पारदर्शक काम करणारा असावा. गर्लफ्रेंड साठी पेपर फोडला. यामध्ये जे कोणी असतील ते समोर येतील एकानेच पेपर फोडला असं नाही यामध्ये अनेक जण असू शकतात पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत गेले आहेत तेही बघावे लागेल” असं रोहित पवार म्हमाले.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in