
भारत श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. कारण भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आहे. पण आता श्रीलंकेने भारतीय संघाला झुंजवल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा सामना हातून जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पहिल्या डावात 503 धावा करून डाव घोषित केला होता. त्यानंतर श्रीलंकन संघ पहिल्या डावात 290 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताकडे पहिल्या डावात 213 धावांची मजबूत आघाडी होती. यासाठी भारताने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच पुन्हा एकदा श्रीलंकेला फलंदाजीची संधी दिली. दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांना झटपट बाद करून सामना जिंकण्याची रणनिती आहे. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 300च्या जवळपास धावा केल्या तरी भारताला सोपं आव्हान मिळू शकतं. त्यामुळे ही रणनिती योग्य आहे. पण श्रीलंकन फलंदाजांनी चांगलाच जम बसवला आहे.
…तर फॉलोऑन देऊनही पराभवाचं तोंड पाहावं लागेल!
टीम इंडिया मजबूत स्थितीत असली तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यामुळे कर्णधार गिलचा निर्णय चुकण्याची शक्यताही आहे. सर्वात प्रथम म्हणजे पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 89.4 षटकं टाकली. यात मानव सुथारने सर्वाधिक 22 षटकं टाकली. तर सारांश जैनने 20.4 षटकं, रवीद्र जडेजाने 20 षटकं, प्रसिध कृष्णाने 16 षटकं, तर मोहम्मद सिराजने 11 षटकं टाकली आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना थकवा आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांनी विकेट न गमावता दीर्घकाळ फलंदाजी केली, तर भारतीय गोलंदाजीची धार कमी होईल. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी खेळपट्टी संथ किंवा सपाट होते, जिथे फलंदाजी करणे सोपे जाते. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 400-450 धावांचा डोंगर उभा केला, तर भारताला सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 200 किंवा त्याहून अधिक धावा कराव्या लागतील. पाचव्या दिवशी कोलंबोची खेळपट्टी प्रचंड प्रमाणात टर्न घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय अंगलट येऊ शकतो.
फॉलोऑन देऊन पराभव झाला असं कधी घडलं?
भारताने कसोटी क्रिकेट इतिहासात फॉलोऑन देऊनही सामना गमावला असं कधीच घडलं नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी दुर्मिळ घटना फक्त चार वेळाच घडली आहे. यात ऑस्ट्रेलियाने तीन वेळा, इंग्लंडने एकदा सामना गमावला आहे. 1894 मध्ये ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिला होता. पण हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला होता. 1981 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलोऑन दिला होता. हा सामनाही इंग्लंडने 18 धावांनी आपल्या पारड्यात टाकला होता. 2001 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला इडन गार्डन्सवर फॉलोऑन देऊनही लोळवलं होतं. हा सामना भारताने 171 धावांनी जिंकला होता. तर 2023 शेवटची अशी स्थिती पाहायला मिळाली होती. तेव्हा इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला होता. पण हा सामना न्यूझीलंडने फक्त 1 धावेने जिंकत इतिहास रचला होता.
Leave a Reply