
मराठवाड्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. आज परभणीत दुपारून शिंदे यांचा शेतकरी संवाद मेळावा होत आहे. खासदार संजय जाधव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप करत जरांगे यांनी हा कार्यक्रम लागलीच रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा परभणीत मोठा गोंधळ होण्याचा इशाराच त्यांनी दिला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply