• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’

July 16, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. फेसबूकवर एक पोस्ट करत आदिनाथ याने घटस्फोटाची घोषणा केली आहे. पण सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी उर्मिला हिने घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलेलं. अभिनेत्री म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतातच असं नाही…’ तर जाणून घ्या उर्मिला तेव्हा नेमकं काय म्हणालेली.

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सोशल मीडियावर काय बोललं जातं आणि काय नाही याचा मी फार विचार करत नाही… त्या चर्चा टॉक्सिकच असतात… सोशल मीडियावरील काही चर्चा खऱ्या असतात, तर काही खोट्या… मी माझ्या कामात इतकी व्यस्त असते की, कोण काय बोलत आहे… यावर लक्ष देणं मला फारसं गरजेचं वाटत नाही…

‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं देखील नाही… म्हणूनच लोकांनी देखील सोशल मीडियावर व्हयरल होणाऱ्या सर्वांत गोष्टींवर खरेपणाचा शिक्का मारणं देखील योग्य नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

आदिनाथ कोठारे याची घटस्फोटावर सोशल मीडिया पोस्ट

आदिनाथ याने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आणि मी आणि उर्मिला परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहोत, अशी घोषणा केली. ‘जोडीदार म्हणून आमचा प्रवास संपत असला तरी, आमची लेक जिजा हिच्यासाठी आम्ही कायम एकत्र असू… तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत.’

‘आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील… आयुष्याच्या नव्या टप्प्यावर देखील तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठिशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे… म्हणूनच आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा… अशी आमची नम्र विनंती’ असं देखील अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला आहे.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचं नातं

एकत्र काम करत असताना उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने दोघांच्या नात्याचं रुपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये आदिनाथ आणि उर्मिला यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी गोंडस लेक जिजा हिचं जगात स्वागत केलं. पण तरी देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in